Astrology Predictions for Number 7 : अंकशास्त्रात व्यक्तीच्या मूलांकावरून भविष्यात होणाऱ्या किंवा पुढे घडणाऱ्या घटनांविषयी अंदाज लावता येतो. तर यासाठी जन्मतारखेवरून व्यक्तीचा मूलांक काढला जातो. मूलांक संख्या ही १ ते ९ पर्यंत असते. मूलांक शोधण्यासाठी त्या व्यक्तीच्या जन्मतारखेची बेरीज केली जाते. जर तुमच्या जन्मतारखेचा एकांक ७ येत असेल, तर आज आपण तुमच्या स्वभावाबद्दल एक खास गोष्ट जाणून घेणार आहोत…
अंकशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेतील संख्या केवळ संख्या नसून त्या विशिष्ट ऊर्जा असते; जी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर प्रभाव पाडते. या संख्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व, विचार, वर्तन, आत्मविश्वास, करिअर आणि नातेसंबंधांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनाला आकार देतात. तर कोणत्याही महिन्याच्या ७, १६ किंवा २५ तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक ७ असतो. ही संख्या नेपच्यून ग्रहाच्या प्रभावाखाली असते, जी गूढता, ऊर्जा, अंतर्ज्ञान आणि खोल विचारांचे प्रतीक मानली जाते.
खोलवर विचार आणि रहस्यमयी स्वभाव
त्यामुळे या जन्मतारखांच्या मुली खोलवर विचार करणाऱ्या आणि रहस्यमयी स्वभाव असणाऱ्या मानल्या जातात. या मुली हुशार, तीक्ष्ण आणि धाडसी असतात. त्यांना सर्वात कठीण काम देखील सोपे वाटते. त्या प्रत्येक काम वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात आणि पूर्ण करतात. आव्हानात्मक परिस्थितीतही अगदी शांतपणे स्विकारतात. या जन्मतारखेच्या मुली सहसा त्यांच्या भावना सहजपणे व्यक्त करत नाहीत. त्या स्वतःच्या मनात अनेक गोष्टी लपवून ठेवतात; ज्यामुळे त्यांना समजणे थोडे कठीण असते.
७ मूलांक असणाऱ्या मुली त्यांच्या करिअरबद्दलही अत्यंत गंभीर असतात. कठोर परिश्रम, समर्पण आणि परफेक्शन ही त्यांच्या कामाची वैशिष्ट्ये आहेत. त्या स्वतःच्या क्षमतेद्वारे कुटुंब आणि समाजात प्रसिद्धी, आदर मिळवण्यात यशस्वी ठरतात. या मुली लगेच सर्वांमध्ये मिसळत नाहीत. पण, जेव्हा त्या मैत्री करतात तेव्हा प्रामाणिकपणे टिकवून ठेवतात. त्या नातेसंबंधांमध्ये अत्यंत निष्ठावान असतात आणि त्यांच्या प्रियजनांसाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात.
