Numerology Number 8 Horoscope : ज्योतिषशास्त्रात जन्मतारीख आणि मूलांकांना विशेष महत्त्व असते. त्यावरून व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांबाबत अंदाज लावला जातो. तर, मूलांकाच्या आधारे करिअर निवडणे किंवा तुमच्या आयुष्यातील एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठीसुद्धा खूप मदत होते. कारण – प्रत्येक संख्येची स्वतःची विशिष्ट ऊर्जा आणि प्रभाव असतो. म्हणूनच एखाद्या व्यक्तीच्या वाढदिवसाच्या तारखेचा वापर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे, वर्तनाचे, क्षमतांचे आणि जीवनाच्या दिशेने अचूक विश्लेषण करण्यासाठी केला जाऊ शकतो.
त्यासाठी जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो; जो १ ते ९ पर्यंत असतो. अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या ८, १७ किंवा २६ तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक ८ असतो. ही संख्या शनि ग्रहाद्वारे नियंत्रित केली जाते. शनि शिस्त, कठोर परिश्रम, संघर्ष आणि न्यायाचे प्रतीक आहे. म्हणूनच ८ मूलांक असलेल्या मुली जीवनात आव्हानांना तोंड देतात आणि त्यांच्या कठोर परिश्रमाने यश मिळवतात.
८ मूलांक असलेल्या मुली व्यावहार आणि नेतृत्व करण्यात पारंगत असतात. त्यांच्याकडे कोणत्याही गोष्टीला योग्य दिशेने नेण्याची क्षमता असते आणि त्या इतरांकडून काम करून घेण्यात सुद्धा माहीर असतात. अंकशास्त्रानुसार, या मुली मनाने खूप संवेदनशील आणि प्रेमळ असतात. पण, त्यांना भावना शब्दांत मांडण्या साठी वेळ लागतो. अंकशास्त्रानुसार, ८ मूलांक असलेल्या मुलींना खोटे बोलणे आजिबात आवडत नाही. त्यांचा स्वभाव सरळ असतो; जे योग्य वाटते तेच बोलतात आणि करतात.
अंकशास्त्रानुसार, ८ मूलांक असलेल्या मुली मेहनती, प्रबळ इच्छाशक्ती असलेल्या आणि मेहनती असतात. त्या कठीण परिस्थितीतही संयम राखतात, ध्येय साध्य होईपर्यंत हार मानत नाहीत. या मुली विचारपूर्वक निर्णय घेतात. म्हणूनच त्या शिक्षण, करिअर आणि व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करतात. त
