August Horoscope: ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन, जन्माष्टमी, तीज, गणेश चतुर्थी असे अनेक मोठे सण साजरे केले जाणार आहेत. त्याचबरोबर ऑगस्टमध्ये काही महत्त्वाचे ग्रह-गोचर होणार आहेत. हे ग्रह परिवर्तन ५ राशींना मोठा धनलाभ करून देऊ शकतात.
ऑगस्ट महिन्याचा एक आठवडा संपत आला आहे आणि पुढील जवळपास २५ दिवसांत सतत ग्रहांची स्थिती बदलणार आहे. सर्वात आधी ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनच्या दिवशी बुध उदय होईल, त्यानंतर बुध मार्गी होतील. मग १७ ऑगस्टला सूर्याचं गोचर होईल आणि २१ ऑगस्टला शुक्राचं गोचर होईल. यासोबतच अनेक ग्रह नक्षत्रही बदलतील. एकूणच ऑगस्ट महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खूप खास ठरणार आहे. विशेषतः ५ राशींसाठी हा काळ खूप शुभ ठरेल.
मेष राशी (Aries Horoscope August)
मेष राशीच्या लोकांसाठी ऑगस्टचे पुढचे २५ दिवस खूप शुभ असतील. करिअरमध्ये फायदा होईल. सकारात्मक बदल होतील. व्यवसाय चांगला चालेल. धार्मिक प्रवासावर जाऊ शकता.
मिथुन राशी (Gemini Horoscope August)
तुमची अडकलेली कामं पूर्ण होतील. नवीन योजना बनवाल आणि त्या पूर्णही कराल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचे योग आहेत.
सिंह राशी (Leo Horoscope August)
सिंह राशीच्या लोकांना देखील ऑगस्टमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्ही कामात बदल कराल. आत्मविश्वास वाढेल. सन्मान मिळेल. जीवनात सुख-सुविधा वाढतील. अडकलेला पैसा मिळेल.
मकर राशी (Capricorn Horoscope August)
मकर राशीवरून शनीची साडेसाती संपली आहे आणि आता त्यांच्या जीवनात पैसा, यश आणि समृद्धी येईल. विवाहाचे योग बनतील. प्रॉपर्टी खरेदी करू शकता.
कुंभ राशी (Aquarius Horoscope August )
कुंभ राशीच्या लोकांना हवं तसं यश मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगती होईल. बँक बॅलन्स वाढेल. मान-सन्मान मिळेल. कुटुंबात आनंद राहील.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)