Baba Vanga Predictions 2026: भविष्यवेत्ती बाबा वेंगांनी तर पुढील वर्षांसाठी अजून खतरनाक भविष्यवाणी केली आहे. बल्गेरियाची रहस्यमय महिला बाबा वेंगा यांनी जगाबाबत अनेक भाकिते केली आहेत आणि त्यातील अनेक खरेही ठरली आहेत. त्यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९११ रोजी झाला होता. बाबा वेंगा यांनी वयाच्या बाराव्या वर्षी दृष्टी गमावल्यानंतर लगेचच त्यांच्याकडे ज्योतिषीय क्षमता असल्याचा दावा केला होता. बाबा वेंगा आता त्यांच्या भाकितासाठी, विशेषतः ९/११ च्या हल्ल्यांबद्दल, राजकुमारी डायनाचा मृत्यू आणि चीनच्या विस्ताराबद्दल, जगभरात प्रसिद्ध आहेत आणि ही भाकिते भूतकाळात खरी ठरली होती, ज्यामुळे सर्व लोकांना त्यांच्या भाकितांवर विश्वास आहे.
आज बाबा वेंगा आपल्यामध्ये नाहीत, पण येणाऱ्या वर्षांतील अनेक गोष्टीबद्दल तिने भाकीत केलं आहे. 2026 साठी केलेल्या भाकीतबद्दल ऐकून मानवाची झोप उडाली आहे.
बाबा वेंगाच्या भविष्यवाणीमुळे जग हादरले
२०२६ साठी बाबा वांगाची भाकित कदाचित तिची सर्वात भयानक चेतावणी होती. तिने घोषित केलंय, “पूर्वेकडून एक वादळ उठेल आणि पश्चिमेला राख करेल.” आता बरेच लोक तिच्या शब्दांचा अर्थ “पूर्वेकडील युद्ध” च्या पूर्वसूचक म्हणून घेतात, एक युद्ध जे एका देशापुरते किंवा सीमेपुरते मर्यादित राहणार नाही. तर संपूर्ण जगाला त्याच्या अंधारात बुडवेल, असं म्हटलं जातं की वांगाने एका “शक्तिशाली नेत्याची” भविष्यवाणी देखील केली होती जो राख आणि रक्तातून उठेल आणि त्याला “जगाचा स्वामी” म्हटलं जाईल.
रशिया, चीन किंवा इतर कोणत्याही शक्तीभोवती फिरणारी ही कल्पनारम्यता आज भयावह वाटते, कारण जग आधीच धुराच्या छायेत बसलं आहे.त्यातच दररोज एक ठिणगी पेटत आहे.
निसर्ग त्याचा क्रूर बदला!
बाबा वांगा यांनी २०२६ सालाची भविष्यवाणी करताना म्हटलं होतं की, “पृथ्वी आता टिकणार नाही. येणारे वर्ष भूकंप, ज्वालामुखी आणि वादळांची मालिका घेऊन येईल जे जगाचा नकाशा बदलू शकतात. यामुळे पृथ्वीचा एक दशांश भाग शांत होईल.” आता, हिमनद्या वितळत असताना, महासागर फुगतात आणि हवामान अप्रत्याशित होत असताना, वांगाचे शब्द काल्पनिक वाटतात परंतु वैज्ञानिक भीती वाटत नाही.
भारतासाठी काय भविष्यवाणी
भविष्यवेत्ती बाबा वेंगा यांनी भारतासाठी संकटांची मालिका वाचली आहे. नैसर्गिक आपत्ती या काळात भारतावर येईल असे भाकीत वर्तवले आहे.भारतात तीव्र पूर, भूस्खलन आणि विक्रमी तापमानाचा अंदाज वर्तवला आहे. वांगाच्या मते, अनेक शहरांना पाण्याची टंचाई भासेल.ज्याचा परिणाम भारतीय राजकारणावर दिसून येईल.शास्त्रज्ञ बाबा वांगाच्या भविष्यवाण्या पूर्णपणे नाकारतात. याची दोन मुख्य कारणे आहेत: पहिले, वांगाच्या भविष्यवाण्यांची कोणतीही लिखित नोंद नाही.
