Shukra Varun Navpancham Rajyog: वैदिक पंचांगानुसार, व्रत आणि सणांवर ग्रहांचे गोचर करून ते शुभ आणि राजेशाही योग निर्माण करतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि देश-जगावर दिसून येतो. गणेश चतुर्थीचा सण २७ ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. या दिवशी शुक्र आणि वरुण नवपंचम राजयोग बनवत आहेत. या दिवशी कर्क राशीत स्थित शुक्र ग्रह वरुण ग्रहाशी संयोग होऊन १२० अंशांवर नवपंचम राजयोग बनवेल. ज्यापासून काही राशींचा सुवर्णकाळ सुरू होऊ शकतो. यासोबतच, या राशींच्या धन आणि संपत्तीत मोठी वाढ होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या भाग्यवान राशी आहेत…
मिथुन राशी (Mithun Zodiac)
मिथुन राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग हा लाभदायी सिद्ध होऊ शकतो. या काळात नशीब तुम्हाला साथ देईल. तसे तुम्हाला प्रलंबित काम पूर्ण होतील. तसेच व्यवसायिकांना धनलाभ होईल. तसेच कोणत्याही मोठ्या व्यवसायिकाबरोबर मोठा करार होऊ शकतो. तसेच नवीन पार्टनर व्यवसायामध्ये जोडले जातील ज्यामुळे लाभ होईल. तसेच कुटुंबाबरोबरील जवळीक वाढेल आणि धार्मिक यात्रेचा योग येऊ शकतो. याकाळा तुम्ही पैशांची बचत कराल.
कर्क राशी (Cancer Zodiac)
नवपंचम राजयोग हा कर्क राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकतो. या काळात तुम्हाला व्यवसायात प्रगती मिळू शकते. तसेच या वेळी तुम्हाला सामाजिक आणि आर्थिक यश मिळू शकते. मित्र आणि गटांबरोबर सहकार्य केल्याने खूप फायदा होईल. त्याचबरोबर तुम्हाला सन्मान आणि आदर मिळू शकेल. उत्पन्नामध्ये वाढ होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. तसेच या काळात तुमची पैसे वाचवण्याची इच्छा पूर्ण होईल.
कन्या राशी (Kanya Zodiac)
नवपंचम राजयोग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. यावेळी बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते. त्याच वेळी, नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तसेच, तुमच्यासाठी नवीन गोष्टी शिकण्याची, आध्यात्मिक कार्यात भाग घेण्याची किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासाची योजना आखण्याची ही वेळ आहे. नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. यावेळी मोठी ध्येये साध्य करण्यासाठी आणि सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी तुमची ऊर्जा वापरा. त्याच वेळी, तुम्ही परदेश प्रवास करू शकता.