Mesh To Meen Daily Horoscope : ११ मार्च २०२५ रोजी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. द्वादशी तिथी मंगळवारी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांपर्यंत चालेल, त्यानंतर त्रयोदशी तिथी सुरू होईल. ११ मार्च रोजी दुपारी २ वाजून १६ मिनिटांपर्यंत सर्वार्थ सिद्धी योग जुळून येईल. तसेच आश्लेषा नक्षत्र मंगळवारी दुपारी २ वाजून १६ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. आज राहू काळ ३ वाजता सुरु होईल. याशिवाय ११ मार्च रोजी मार्च महिन्यातील पहिला आणि मराठी वर्षातील शेवटचे भौम प्रदोष व्रत असणार आहे. हा व्रत महादेवाला समर्पित असतो. तर आज महादेवाची कृपा कोणत्या राशीच्या आयुष्यात सुख, ऐश्वर्य, वैभव, सौभाग्य घेऊन येणार जाणून घेऊया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

११ मार्च पंचांग व राशिभविष्य (Mesh To Meen Horoscope) :

मेष:- वागण्या-बोलण्यात काहीसा हटवादीपणा येईल. कामात गतीमानता येईल. स्वत:बद्दलच्या नसत्या कल्पना बाजूला साराव्यात. बुद्धिचातुर्याने कामे कराल. परिस्थितीनुरूप वागणे ठेवाल.

वृषभ:- वागण्यात कर्मठपणा आणाल. वडीलांचा मान ठेवून निर्णय घ्यावा. प्रगल्भतेने वागणे ठेवाल. न्यायी वृत्तीने मत मांडाल. नवीन विचार आत्मसात करावेत.

मिथुन:- प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. आरोग्याची काळजी घ्यावी. अति विचार करू नका. अचानक धनलाभ संभवतो. मनातील आकांक्षा पूर्ण होईल.

कर्क:- शांत व संयमी विचार कराल. वैचारिक आधुनिकता ठेवावी. जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. भावंडांना मदत कराल. घराची सजावट कराल.

सिंह:- चुकीच्या लोकांमुळे मन:स्ताप होण्याची शक्यता आहे. परिस्थिती जाणून योग्य मार्ग काढावा. सर्दी, खोकला यांसारखे त्रास संभवतात. वाताचे विकार बळावू शकतात. गैरसमजुतीतून वाद वाढवू नका.

कन्या:- मनातील नसते संशय काढून टाकावेत. अत्यंत व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल. आपल्या बुद्धिमत्तेचा सदुपयोग करावा. दीर्घकाळ चिकाटीने कामे कराल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.

तूळ:- घरगुती कामात अधिक कष्ट पडू शकतात. आपल्या गृहसौख्याकडे अधिक लक्ष द्यावे. हातातील कामात यश येईल. नातेवाईकांना मदत करावी लागेल. प्रवासात वाहन जपून चालवावे.

वृश्चिक:- काही गोष्टींचा अधिक खोलवर विचार करावा. धैर्याने कामे हाती घ्याल. व्यवसायात चांगली आर्थिक कमाई होईल. हातात काही नवीन अधिकार येतील. कौटुंबिक खर्चाचा ताण राहील.

धनू:- काही बदल जाणीवपूर्वक करावेत. नसत्या वादात अडकू नका. निराशेच्या आहारी जाऊ नये. घराची कामे सुरळीत पार पडतील. स्वबळावर कामे उरकाल.

मकर:- जुन्या गोष्टींचा आधार घेणे टाळावे. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. कामातील अडथळे प्रयत्नाने दूर करावे लागतील. छुप्या शत्रूंची डोकेदुखी वाढेल. हातातील अधिकार वापरावेत.

कुंभ:- उगाचच कोणाशीही वैर पत्करू नका. काही कारणाने घरापासून दिवसभर दूर राहावे लागेल. गप्पांची मैफल जमवाल. तुमच्या बोलण्याचा चांगला प्रभाव पडेल. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.

मीन:- कामाचा योग्य आढावा घ्यावा. मानसिक ताण जाणवेल. कामातील दिरंगाई टाळण्याचा प्रयत्न करावा. मानापमान फार मनावर घेऊ नका. आपले स्वत्व गुण राखून वागाल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhaum pradosh vrat on 11 march 2025 mahadev will give happiness wealth and sucess to these zodiac signs read zodiac signs horoscope in marathi asp