Budh Asta In Leo 2024: ग्रहांचा राजकुमार बुध हा बुद्धिमता, संवाद आणि निर्णय क्षमतेचा कारक मानला जातो. बुध ग्रहाने चाल बदलली तर याचा परिणाम प्रत्येक राशीच्या व्यक्तींच्या जीवनावर होतो. सध्या बुध सिंह राशीत विराजमान असून पंचांगानुसार, बुध ग्रह ३ ऑगस्ट रोजी रात्री ८:५० वाजता अस्त सिंह राशीत झाले आहेत. तसंच आज ४ ऑगस्ट रविवार आषाढी अमावस्यासह रविपुष्य योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. यादिवशी दिव्यांची पूजा करुन दीप पूजन केले जाते. त्यामुळे या दोन्ही शुभ स्थितीचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र, यावेळी तीन राशी आहेत ज्यांना यावेळी करिअर आणि व्यवसायात मोठे यश मिळू शकते. मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. जाणून घेऊया बुध लक्ष्मीची कोणत्या राशींच्या व्यक्तींवर विशेष कृपा असणार आहे. मिथुन राशी (Mithun Zodiac) बुधाची अस्त स्थिती मिथुन राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहू शकते. कामात वडिलांचे सहकार्य लाभू शकते. प्रत्येक कामात पूर्ण सहकार्य मिळू शकतो. नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर मार्ग मोकळा होऊ शकतो. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चांगले यश मिळू शकते. ऑफिसमध्ये नवीन बदल घडू येऊ शकतात. नोकरीत फायदा होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची साथ मिळण्याची शक्यता आहे. अविवाहित आहेत त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. (हे ही वाचा : ११ ऑगस्टपासून सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? ‘धनाचा दाता’ देऊ शकतो लखपती बनण्याची संधी) सिंह राशी (Leo Zodiac) सिंह राशींच्या मंडळीसाठी बुधदेवाची अस्त स्थिती फायदेशीर ठरु शकते. या काळात या राशीच्या उत्पन्नात अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. धनवृद्धीमुळे दीर्घकाळ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. आर्थिक लाभासोबतच तुमच्या कामाच्या ठिकाणीही प्रगतीची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात मान-सम्मान मिळून आपली प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. बेरोजगार असणाऱ्या लोकांचे या दरम्यान भाग्य खुलू शकते. सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरु शकतो. कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहण्याची शक्यता आहे. कुंभ राशी (Kumbha Zodiac) बुधाची अस्त स्थिती कुंभ राशीच्या लोकांसाठी वरदानच ठरु शकते. नवे आर्थिक स्रोत या काळात खुले होऊ शकतात. नात्यात गोडवा राहण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. करिअरमध्ये यश मिळू शकतो. व्यावसायिकांना मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. भागीदारीच्या कामात फायदा होऊ शकतो. रखडलेली कामं पुन्हा वेगाने सुरु होऊ शकतात. व्यवसायात आणि नोकरीच्या ठिकाणी आनंदाची बातमी मिळू शकते. या काळात वाहन किंवा मालमत्ता खरेदी करु शकता. समाजात मान सन्मान वाढू शकतो. (टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)