Budh Gochar on 29 July: २९ जुलै रोजी बुध ग्रह पुष्य नक्षत्रात गोचर करणार आहेत. या गोचरामुळे काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात विशेष फायदा आणि सकारात्मक बदल होऊ शकतो.

बुध ग्रह पुन्हा एकदा आपलं नक्षत्र बदलणार आहे, ज्याचा परिणाम १२ राशींवर चांगला किंवा वाईट होऊ शकतो. २९ जुलै २०२५, मंगळवार रोजी संध्याकाळी ४ वाजून १७ मिनिटांनी बुध ग्रह पुष्य नक्षत्रात गोचर करणार आहेत. लक्षात ठेवा, पुष्य नक्षत्राचे स्वामी शनी आहेत आणि या नक्षत्राचे देवता गुरु आहेत. या गोचरामुळे ४ राशीच्या लोकांवर खूप शुभ परिणाम होणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.

मिथुन राशी (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांना बुधाच्या नक्षत्र गोचरामुळे अनेक फायदे होऊ शकतात. बोलणं आणि आर्थिक बाबतीत यश मिळण्याची शक्यता आहे. खाणकाम, शिक्षण, पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना भाग्य साथ देईल. अडकलेले पैसे या काळात मिळू शकतात. सल्ल्यानंतर केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मान-सन्मानात वाढ होईल.

कन्या राशी (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांना बुधाच्या गोचरामुळे खास फायदा होऊ शकतो. त्यांची बौद्धिक क्षमता वाढेल. आपल्या उद्दिष्टांकडे जाण्याचा मार्ग मोकळा होईल. सहकर्मी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. व्यवसायात वाढीच्या संधी मिळतील. खास करून तांत्रिक आणि संवाद क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगला फायदा होईल. धन लाभ होण्याची शक्यता आहे. सामाजिक संबंधही वाढतील.

तूळ राशी (Libra Horoscope)

तुळ राशीच्या लोकांसाठी बुधाचं हे गोचर शुभ परिणाम देईल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होईल आणि समाजात मान-सन्मान वाढेल. व्यापारी लोकांना नवीन डील्स आणि भागीदारी मिळू शकते. संवाद कौशल्यात सुधारणा होईल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा जास्त मजबूत होईल. अडकलेली कामं पूर्ण झाल्यामुळे पैशाचे मार्ग खुलतील. आयुष्यात सुख-शांती कायम राहील.

धनु राशी (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी बुधाचं हे गोचर शुभ ठरणार आहे. उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासात आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकतं. लोकांचा आध्यात्मिकतेकडे कल वाढू शकतो. व्यापाऱ्यांना परदेशी संपर्कांमुळे धन लाभ आणि व्यवसाय वाढवण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती सुधारण्याचे मार्ग मोकळे होतील. मनाला शांतता मिळेल.