Budh Gochar in Kanya 2023: ऑक्टोबर महिन्यात अनेक महत्त्वपूर्ण ग्रहांचे गोचर होणार आहे. अगदी महिन्याच्या सुरुवातीलाच बुध गोचर झाले आहे. यानंतर आता मंगळ, सूर्य, शुक्र, राहू- केतू यांचे सुद्धा गोचर होणार आहे. या ग्रह गोचारांनुसार २०२३ चा ऑक्टोबर महिना काही राशींसाठी अत्यंत खास सिद्ध होऊ शकतो. १ ऑक्टोबरला ग्रहांचे राजकुमार बुध ग्रह स्वराशीत म्हणजेच कन्या राशीमध्ये प्रवेश घेऊन स्थिर झाले आहेत. यामुळे भद्रा राजयोग तयात झाला आहे. ज्योतिषशास्त्रात भद्र राजयोग हा अत्यंत शुभ मानला जातो. बुध ग्रह हा धन-व्यापार, बुद्धी, तर्क व विचार यांचा कारक आहे. यामुळेच त्याचा प्रभाव पडणाऱ्या राशी या सर्व क्षेत्रात प्रगती अनुभवू शकतात. चला तर मग ऑक्टोबर महिन्यातील बुध ग्रह गोचरापासून बनलेल्या भद्र राजयोगाचा कोणत्या राशीला व कसा फायदा होणार हे पाहूया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भद्र राजयोग बनल्याने ‘या’ राशींचे नशीब फळफळणार

कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)

कन्या राशीतच बुध ग्रहाचा प्रवेश झाला आहे. भद्र राजयोग सुद्धा या राशीत पहिल्या स्थानी प्रभावशाली असणार आहे. या राशीच्या मंडळींना आत्मविश्वास वाढल्याचे जाणवेल. कामाच्या ठिकाणी तुमचा स्वभाव आड आणू नये, वाणीमध्ये माधुर्य आणल्यास अनेक कामे मार्गी लागतील. भागीदारीत काम करणाऱ्यांना लाभ होऊ शकतो. तुमची इच्छाशक्ती या काळात प्रभावी ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल. एका पाठोपाठ एक अभिमानाचे आणि कौतुकाचे क्षण वाट्याला येतील. व्यवसायात सुद्धा धनलाभाची चिन्हे आहेत.

मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)

मकर राशीला सुद्धा भद्र राजयोग लाभदायक सिद्ध होणार आहे. या मंडळींचा भाग्योदयाचा कालावधी लवकरच सुरु होणार आहे. तुमची कामे मार्गी लागताना दिसतील त्यामुळे प्रगतीचा आणि आर्थिक फायदे मिळवण्याचा वेग वाढणार आहे. तुम्हाला वाहन व जमिनीच्या खरेदीचे योग आहेत. तुम्हाला परदेश प्रवासाची एखादी संधी चालून येऊन शकते. स्वप्नपूर्तीला हातभार लावणारा असा हा कालावधी सिद्ध होणार आहे. तुमच्या आयुष्यात एखाद्या नव्या व्यक्तीचा प्रवेश होऊ शकतो.

हे ही वाचा<< २०२४ मध्ये शनी मार्गी व गुरु-चांडाळ योग ‘या’ राशींच्या प्रगतीचा वेग वाढवणार! नवीन वर्षात मिळेल लक्ष्मीकृपा

धनु रास (Sagittarius Rashi Bhavishya)

भद्र राजयोग बनल्याने धनु राशीला करिअर व आर्थिक बाबींमध्ये बळ मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गाला नव्या ऑर्डर्स मिळू शकतात शिवाय तुम्ही अशा काही लोकांशी जोडले जाऊ शकता ज्यांचा प्रदीर्घ कालावधीत तुम्हाला फायदा होऊ शकतो. नोकरदार मंडळींना नोकरीत बदलाचे संकेत आहेत. जबाबदारीसह तुमचे आर्थिक लाभ सुद्धा वाढू शकतात. तुम्हाला वरिष्ठ व कनिष्ठ सर्व सहकाऱ्यांची कामामध्ये खूप मदत होईल यामुळे तुमची अनेक कामे मार्गी लागतील शिवाय संबंध सुधारतील.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budh graha gochar bhadra rajyog make diwali in october 2023 these rashi to get vaibhav dhan lakshmi blessing money svs