Dussehra Horoscope: दसऱ्याच्या दिवशी २ ऑक्टोबरच्या मध्यरात्री बुध ग्रहाचा प्रवेश तूळ राशीत होईल. बुधाची मंगळबरोबर युती होईल, ज्यामुळे बुद्धी आणि शक्तीचा सुंदर संगम तयार होईल. ज्योतिषानुसार हे गोचर मेष, कर्क आणि इतर काही राशींसाठी शुभ आणि फायदेशीर ठरेल. या गोचरामुळे नेमक्या कोणत्या राशींना लाभ होईल ते जाणून घेऊया…

दसऱ्याच्या दिवशी म्हणजे २ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीनंतर ३ वाजून ४३ मिनिटांनी बुधाचा गोचर तूळ राशीत होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस दसऱ्याचाच मानला जाईल कारण ३ ऑक्टोबरच्या सूर्योदयापूर्वीच बुध तूळ राशीत प्रवेश करणार आहे. पण आधुनिक ज्योतिषानुसार हे गोचर ३ ऑक्टोबरचं धरलं जाईल.

हे गोचर खूप महत्त्वाचा आहे कारण तूळ राशीत आधीपासूनच असलेल्या मंगळासोबत बुधाची युती होईल. त्यामुळे बुध–मंगळ योग तयार होईल. ज्योतिषशास्त्रात बुधाला बुद्धीचा कारक आणि ग्रहांचा राजकुमार मानले जाते, तर मंगळाला शक्ती, उत्साहाचा कारक आणि ग्रहांचा सेनापती मानले जाते. त्यामुळे या दोन्ही ग्रहांची युती झाल्याने बुद्धी आणि शक्तीचा सुंदर संगम होईल. यामुळे मेष, कर्कसह अनेक राशींना फायदा होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया, तूळ राशीत बुधाच्या गोचरामुळे कोणत्या राशींना शुभ लाभ मिळणार आहे.

मेष राशी (Aries Horoscope)

या राशीच्या लोकांच्या सप्तम भावात बुधाचं गोचर होत असल्याने मंगळ आणि चंद्राची युती होत आहे. त्यामुळे तुम्हाला व्यापारात यश मिळेल आणि धैर्यही वाढेल. मंगळाला ऊर्जा, साहस आणि संपत्तीचा कारक मानले जाते. ही युती तुम्हाला धाडसी आणि यशस्वी बनवेल. चंद्र मन आणि भावनांचा कारक आहे, त्यामुळे तो तुमची मानसिक स्थिती मजबूत करेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील आणि करिअरमध्येही यश मिळेल. जोडीदारासोबत छान वेळ घालवाल आणि ते प्रत्येक टप्प्यावर तुमच्या पाठीशी उभे राहतील.

कर्क राशी (Cancer Horoscope)

बुधाचं गोचर कर्क राशीच्या चौथ्या भावात होईल. त्यामुळे मंगळ आणि चंद्राची युती होईल, ज्यामुळे तुमच्या जीवनात आनंद वाढेल. जर खूप दिवसांपासून समस्या येत असतील तर आता त्यातून सुटका मिळू शकते. आर्थिक बाबतीत फायदा होईल आणि पैसा मिळवण्याच्या चांगल्या संधी तयार होतील. मालमत्तेशी संबंधितही लाभ मिळू शकतो. तुमच्या धैर्य आणि साहसात वाढ होईल आणि आत्मविश्वास मजबूत होईल. मात्र, सामाजिक क्षेत्रात हा काळ थोडा कमी फायदेशीर ठरू शकतो. पण व्यवसाय आणि पैशांच्या बाबतीत बुधाचा गोचर तुमच्यासाठी खूप शुभ राहील.

तूळ राशी (Libra Horoscope)

या राशीच्या प्रथम भावात बुधाचं गोचर होत आहे. तूळ राशीत बुधाच्या प्रवेशामुळे तुम्हाला खूप शुभ लाभ मिळतील. चंद्र आणि मंगलाची युती तुम्हाला धाडसी बनवेल. त्यामुळे कामाच्या ठिकाणी धाडसी निर्णय घेतल्याने फायदा होईल आणि व्यक्तिमत्त्वही आकर्षक दिसेल. चंद्र–मंगल योगामुळे मन मजबूत राहील आणि भावना नियंत्रणात राहतील. प्रेमसंबंधातही हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला ठरेल, नातं अधिक गहिरं होईल. व्यापारातही चांगला फायदा मिळेल. या काळात आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि जीवनात आनंद वाढेल.

धनु राशी (Sagittarius Horoscope)

बुधाचं गोचर धनु राशीच्या अकराव्या भावात होत आहे. त्यामुळे तुम्हाला अनेक क्षेत्रांत फायदा मिळू शकतो. जर तुम्ही पैशांच्या बाबतीत योग्य अंदाज आणि निर्णय घेऊन पुढे गेलात तर त्याचा तुम्हाला लाभ होईल. तसेच पैसे कमावण्याच्या चांगल्या संधी मिळतील. व्यवसाय आणि व्यापारातही फायदा होण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता. पण धोकादायक कामे किंवा निर्णय टाळावे लागतील. कुटुंबाच्या बाबतीत वेळ चांगला जाईल आणि घरच्या लोकांसोबत आनंदी वेळ घालवाल.

मकर राशी (Capricorn Horoscope)

तुमच्या राशीच्या दहाव्या भावात बुधाचं गोचर होत आहे. चंद्र आणि मंगळाच्या युतीमुळे व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल ठरेल. तुम्हाला व्यापारात प्रगतीची नवी दारे उघडतील आणि यश मिळेल. सरकारी नोकरी करणाऱ्यांना मोठं पद मिळू शकतं, ज्यामुळे आनंद दुप्पट होईल. कामाच्या ठिकाणी मेहनतीमुळे चांगला फायदा मिळेल आणि पैशात वाढ होईल. तसेच वैयक्तिक जीवनातही सकारात्मक वातावरण राहील.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)