Budh Margi 2025: १८ जुलै २०२५ पासून बुध ग्रह वक्री झाले आहेत आणि ११ ऑगस्ट २०२५ रोजी पुन्हा मार्गी होतील. त्यामुळे सर्व १२ राशींवर याचा प्रभाव दिसून येईल. पण ४ राशींवर बुधाचे मार्गी होणे चांगला आणि सकारात्मक परिणाम देईल. चला तर मग पाहूया कोणत्या आहेत त्या ४ भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते शुभ परिणाम मिळणार आहेत.

मेष राशी (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांवर बुधाचे मार्गी होणे खूप चांगला प्रभाव टाकू शकतो. त्यांच्या आयुष्यात चांगले आणि मोठे बदल होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी नवीन लोकांशी संपर्क होईल. व्यवसायासाठी प्रवासाचे योग येतील. शिक्षण आणि संवाद क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी प्रगतीचे मार्ग खुलतील. मोठे निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

मिथुन राशी (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी बुधाचे मार्गी होणे शुभ परिणाम देणारे ठरेल. विचारात स्पष्टता येईल. निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. बोलण्याची शैली चांगली होईल. कुटुंबात शुभकार्य होण्याची शक्यता आहे. राजकारणात काम करणाऱ्यांना जनसंपर्काद्वारे आपली बाजू मजबूत करता येईल. लोकांना आपले विचार मांडण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळू शकते.

कर्क राशी (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांच्या बुद्धीमध्ये आणि सर्जनशीलतेमध्ये चमक येईल. नवीन गोष्टी शिकण्यासाठी ते पुढे येतील. हा काळ स्वतःवर विचार करण्याचा आहे, ज्यात ते आपल्या कमकुवत गोष्टी सुधारू शकतात. खर्च वाढतील, पण उत्पन्न वाढवण्याचे मार्गही खुलतील. परदेशी संपर्कांमधून फायदा होईल आणि सामाजिक व व्यावसायिक नातेसंबंध चांगले होतील. नवीन मित्र मिळतील.

कुंभ राशी (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी बुधाचे मार्गी होणे संपत्ती वाढवणारे ठरू शकते. ते सकारात्मक आणि सर्जनशील पद्धतीने स्वतःचा फायदा करू शकतील. जमिनीशी संबंधित कायदेशीर प्रकरणांमध्ये त्यांना लाभ मिळू शकतो. सामाजिक स्तरावर त्यांची प्रतिमा मजबूत होईल आणि आत्मविश्वास वाढेल. वाढलेल्या आत्मविश्वासामुळे ते आपली कामं यशस्वीपणे पूर्ण करू शकतील. कुटुंबात सुख आणि शांतता वाढेल.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)