Budh-Shukra Yuti: ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. तर बुध ग्रहाला वाणी, बुद्धीचा कारक ग्रह मानले जाते. जेव्हा हे दोन्ही ग्रह एकाच राशीत उपस्थित असतात तेव्हा त्यांची युती निर्माण होते. या युतीचा शुभ-अशुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो.

पंचांगानुसार, २ नोव्हेंबर २०२५ रोजी शुक्राचा तूळ राशीत प्रवेश झाला असून २६ नोव्हेंबरपर्यंत तो याच राशीत राहील. याचदरम्यान, २३ नोव्हेंबर रोजी ७ वाजून ५८ मिनिटांनी बुध देखील तूळ राशीत प्रवेश करेल, त्यामुळे या काळात बुध-शुक्राची युती निर्माण होईल. या दोन ग्रहांच्या युतीमुळे “लक्ष्मी-नारायण योग” निर्माण होतो. हा योग खूप प्रभावी मानला जातो.

‘लक्ष्मी-नारायण योग’ देणार सुख-समृद्धी

मेष (Mesh Rashi)

मेष राशीच्या व्यक्तींसाठी लक्ष्मी-नारायण योग अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांचीही मदत प्राप्त होईल, पगारवाढ होईल. घरात शुभ कार्ये होतील. वैवाहिक आयुष्यदेखील सुखमय असेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत.

तूळ (Tula Rashi)

हा योग तूळ राशीसाठी खूप फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगला बदल पाहायला मिळेल; तसेच अडकलेले पैसे परत मिळतील. अडकलेली कामेही पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. आरोग्याच्या समस्याही नाहीशा होतील. पौर्णिमेचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल.

कुंभ (Kumbha Rashi)

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा योग खूप अनुकूल असेल. धन-संपत्तीत प्रचंड वाढ होईल. या लोकांच्या आयुष्यात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. त्यामुळे आजपर्यंत जे अशक्य वाटत होते, ते शक्य करून दाखवाल. गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)