Surya Budh Yuti 2 October: वैदिक ज्योतिषानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो. आत्ता सूर्य आणि बुध कन्या राशीत आहेत. १५ सप्टेंबरला बुध कन्या राशीत गेला आहे आणि १७ सप्टेंबरला सूर्यही तिथे गेला आहे. सूर्य-बुधाची ही युती २ ऑक्टोबरपर्यंत राहील. कन्या राशीत राहून सूर्य-बुध काही राशींना चांगले परिणाम देतील. चला तर मग पाहू या ही युती कोणत्या राशींना फायदा देईल.

सिंह राशी (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्य-बुधाची युती चांगली ठरू शकते. या काळात तुमच्या अडचणींचा उपाय मिळू शकतो. उत्पन्न वाढेल आणि मोठे आर्थिक यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रयत्न यशस्वी होईल. नोकरीत बढती मिळू शकते. एखाद्या जुन्या मित्राला भेटल्याने आनंद वाढेल.

कन्या राशी (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी सूर्य-बुधाची युती शुभ ठरेल. या काळात तुम्हाला समाजात मान-सन्मान मिळेल. काही लोकांना परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. ऑफिसमध्ये नवे काम किंवा जबाबदारी मिळू शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला ठरेल. आरोग्याच्या त्रासातून सुटका होईल.

वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक चांगले बदल होऊ शकतात. या काळात गुंतवणुकीच्या चांगल्या संधी मिळतील. नोकरी शोधणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. व्यापाऱ्यांना नवी डील मिळू शकते. कामांमध्ये हव्या तशा यशाची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे वाद मिटतील आणि तुम्ही एकत्र चांगला वेळ घालवू शकता.

कुंभ राशी (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांना या काळात भाग्याची साथ मिळेल आणि अचानक धनलाभ होऊ शकतो. ऑफिसमध्ये वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. नवी नोकरीची संधी मिळेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो. व्यापाऱ्यांना चांगला नफा होईल.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)