Budh Yam Yuti: वैदिक ज्योतिषानुसार बुध हा नवग्रहांमध्ये खास ग्रह मानला जातो. त्याला ग्रहांचा राजकुमार म्हणतात. बुध हा बुद्धी, विचारशक्ती, तर्क, मान-सन्मान यांचा कारक आहे. त्यामुळे बुधाच्या स्थितीत बदल झाल्यास त्याचा परिणाम १२ राशींवर काही ना काही प्रकारे होतो. बुध साधारणपणे एका महिन्यात २ वेळा राशी बदलतो.

सध्या बुध आपल्या स्वतःच्या कन्या राशीत आहे. या राशीत असताना बुधाची इतर ग्रहांसोबत युती होते. आता बुध आणि यम यांच्या संयोगाने नवपंचम राजयोग तयार होणार आहे. या राजयोगामुळे काही राशीच्या लोकांना नोकरी-व्यवसायात यश, धनलाभ आणि आनंद मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊ या भाग्यवान राशी कोणत्या आहेत.

वैदिक ज्योतिषानुसार १९ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजून ४ मिनिटांनी बुध आणि यम एकमेकांपासून १२० अंशांवर असतील. यामुळे नवपंचम राजयोग तयार होईल. त्या वेळी यम मकर राशीत असेल.

मिथुन राशी (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी बुध-यम यांचा नवपंचम राजयोग खूप खास ठरू शकतो. त्यांना मुलांकडून आनंद मिळेल. धनलाभाचे अनेक मार्ग उघडू शकतात. करिअरमध्ये नोकरी किंवा एखादा मोठा प्रोजेक्ट मिळू शकतो, तसेच परदेश प्रवासाची संधीही मिळू शकते. व्यवसायात नफा मिळण्याचे योग आहेत. जीवनात आनंद वाढेल. शेअर बाजार किंवा सट्ट्यातूनही चांगला फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील. चांगली कमाई होईल आणि भविष्यासाठी बचतही करता येईल. वैवाहिक जीवनही सुखी राहील.

कन्या राशी (Virgo Horoscope)

कन्या राशीत बुध लग्नात आहे आणि यम पाचव्या भावात आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग खूप लाभदायक ठरू शकतो. त्यांना जलद प्रगती आणि सर्व क्षेत्रात यश मिळू शकते. प्रवास करून त्यांना चांगले फायदे मिळतील. करिअरमध्ये मेहनतीचे फळ मिळेल आणि नवीन नोकरीच्या संधी मिळतील. व्यवसायातही नफा होईल. ते आपल्या प्रतिस्पर्ध्यांना चांगला सामना देतील. उत्पन्न लवकर वाढेल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगले राहील. जोडीदारासोबतचे नाते मजबूत होईल.

तूळ राशी (Libra Horoscope)

या राशीत बुध बाराव्या भावात आणि प्लूटो चौथ्या भावात असेल. त्यामुळे बुध-प्लूटोचा नवपंचम राजयोग या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ देऊ शकतो. वाहन किंवा घर खरेदी करू शकतात. आई-वडिलांचा पूर्ण पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमचे उद्दिष्ट पूर्ण करू शकाल. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना यश मिळेल आणि ते समाधानी राहतील. अध्यात्माकडे तुमचा अधिक कल वाढेल. कुटुंबासोबतही चांगले संबंध राहतील.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)