Budh Gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. नवग्रहात बुधाला खूप महत्वपूर्ण मानले जाते. बुधाच्या राशी किंवा नक्षत्र परिवर्तनाने १२ राशींच्या व्यक्तींवर त्याचा शुभ किंवा अशुभ परिणाम पाहायला मिळतो. दरम्यान, नुकताच २४ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी बुध ग्रहाने ५ वाजून २६ मिनिटांनी मकर राशीमध्ये प्रवेश केला आहे. बुधाचे हे राशी परिवर्तन काही राशींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुध करणार मालामाल

मेष

मेष राशींच्या व्यक्तींसाठी बुधाचा मकर राशीतील प्रवेश सकारात्मक फळ देणारा सिद्ध होईल. या काळात मेष राशीच्या व्यक्तींच्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. या काळात तुमच्या आयुष्यात आकस्मिक धनलाभ होईल. तुमचे वैवाहिक जीवन सुखमय असेल. नव्या वस्तू खरेदी कराल. आई-वडीलांची पुरेपुर साथ मिळेल. मेहनतीचे फळ मिळेल. अविवाहितांची लग्ने जुळतील.

वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींनाही बुधाचे राशी परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. तुम्हाला भाग्याची पुरेपुर साथ तुम्हाला मिळेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल.

कर्क

बुधाचा मकर राशीतील प्रवेश कर्क राशीच्या व्यक्तींसाठीही लाभदायी सिद्ध होईल.आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. अविवाहितांची लग्ने जुळतील. धार्मिक कार्यात तुमचे मन रमेल. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील.

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचा कुंभ राशीतील प्रवेश अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल आणि प्रेमसंबंधही सुखमय होतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

मीन

मीन राशीच्या व्यक्तींसाठीही बुध ग्रहाचा मकर राशीतील राशी परिवर्तन शुभ फळ प्रदान करणारे ठरेल. या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. अडकलेली कामे पूर्णत्वास येतील. आरोग्य तक्रारी बंद होतील.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budha gochar 25 mercurys entry into saturns sign will brighten the fortunes of the persons sap