Chandra Grahan on 7 September: चंद्रग्रहण ही फक्त आकाशातील घटना नसून त्याचा माणसाच्या मनावर आणि जीवनावरही खोल परिणाम होतो. २०२५ सालचे शेवटचे चंद्रग्रहण ७ सप्टेंबरला लागणार आहे आणि ते खूप खास आहे.
७ सप्टेंबरला होणारे या वर्षाचे दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण कुंभ राशीत पूर्वाभाद्रपद नक्षत्रात लागणार आहे. इतकेच नाही तर हे पूर्ण चंद्रग्रहण आहे जे भारतात दिसणार आहे. त्यामुळे मेष ते मीन राशीपर्यंत सर्वांवर याचा परिणाम होईल. जाणून घ्या कोणत्या राशींवर या चंद्रग्रहणाचा चांगला प्रभाव होईल.
मेष राशी (Aries Zodiac Signs)
मेष राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण चांगले राहणार आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. खास करून व्यापाऱ्यांसाठी हा वेळ चांगला असेल. आजारांपासून आराम मिळेल.
मिथुन राशी (Gemini Zodiac Signs)
मिथुन राशीच्या लोकांना या चंद्रग्रहणामुळे अडकलेले पैसे मिळतील आणि बँक बॅलन्स वाढेल. तब्येत सुधारेल. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल. एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होऊ शकते.
कन्या राशी (Virgo Zodiac Signs)
कन्या राशीच्या लोकांना चंद्रग्रहणामुळे मोठ्या वादात किंवा प्रकरणात विजय मिळू शकतो. शत्रू पराभूत होतील. जीवनात सुख-सुविधा वाढतील. मुलांकडून आनंद मिळेल.
वृश्चिक राशी (Scorpio Zodiac Signs)
चंद्रग्रहण वृश्चिक राशीच्या लोकांना धन आणि समृद्धी देईल. नवीन घर, वाहन खरेदी करू शकतात. कुटुंबात सुख वाढेल. आई-वडिलांची तब्येत सुधारेल. कामातील अडथळे दूर होतील आणि कामे पूर्ण होऊ लागतील.
धनु राशी (Sagittarius Zodiac Signs)
धनु राशीसाठी चंद्रग्रहण धनवाढ करणारे ठरेल. नोकरी करणाऱ्यांना फायदा होईल. पद, मान-सन्मान आणि पैसा मिळेल. भावंडांशी नाते अधिक घट्ट होईल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)