Chandra Shukra Yuti 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, १४ मार्चला होळी साजरी केली जाणार आहे आणि होळीच्या दोन दिवसानंतर १७ मार्च रोजी चंद्र देव तुळ राशीमध्ये प्रवेश करणार. चंद्र देव तुळ राशीमध्ये प्रवेश करत असल्याने शुक्र आणि चंद्र देवाची युती निर्माण होईल कारण शुक्र देव तुळ राशीचे स्वामी ग्रह आहे. जाणून घेऊ या तुळ राशीमध्ये शुक्र आणि चंद्राची युती निर्माण झाल्याने कोणत्या राशींना लाभ मिळू शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिथुन राशी

चंद्र देव आणि शुक्राच्या युतीने मिथुन राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे या दरम्यान या लोकांच्या जीवनात चांगल्या गोष्टी घडतील. या लोकांच्या आयुष्यात खूप आनंदाचे आगमन दिसून येईल. मिथुन राशीच्या लोकांना व्यवसायात प्रगतीच्या संधी प्राप्त होऊ शकतात. सर्व आर्थिक इच्छा पूर्ण होईल. या दरम्यान जेवढा हे लोक प्रयत्न करतील, तेवढा त्यांना लाभ मिळेल. व्यवसायामध्ये आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळू शकतात. कुटुंबात दुसऱ्या सदस्यांचे सहकार्य लाभेन. धन स्थिती उत्तम राहीन.

कर्क राशी

चंद्र देव आणि शुक्राच्या युतीने कर्क राशीच्या लोकांसाठी उत्तम ठरणार आहे. जीवनात आनंद दिसून येईल. धन संपत्ती वाढणार. कार्यक्षेत्रामध्ये कौतुक केल्या जाईल. शुभ चिंतक या लोकांचा साथ देईन. या लोकांची जबाबदारी वाढेन. नोकरी करणाऱ्या लोकांना आर्थिक लाभाच्या भरपूर संधी मिळू शकतात. नोकरीमध्ये प्रमोशनचे योग जुळून येत आहे

तुळ राशी

चंद्र देव आणि शुक्राच्या युतीने तुळ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत राहीन. जवळच्या प्रवासातून चांगले परिणाम दिसू येईल. कौटुंबिक जीवन उत्तम राहीन. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना धन लाभाच्या अनेक संधी प्राप्त होऊ शकतात. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. मानसिक स्थिती उत्तम राहीन. जमीनीशी संबंधित कामांमध्ये धनलाभ मिळू शकतो. नवीन व्यवसायापासून आर्थिक लाभ मिळू शकतो.
प्रवासाचे योग जुळून येईल जे आर्थिक दृष्टीने शुभ राहीन.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandra shukra yuti 2025 two days after holi three zodiac get immense money wealth and become rich ndj