Dhantrayodashi 2024: हिंदू धर्मामध्ये दिवाळीचा सण खूप उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीत लक्ष्मीपूजनासह धनत्रयोदशीचा दिवसही खूप आनंदात साजरा केला जातो. पौराणिक मान्यतेनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते. येत्या २९ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाईल. तसेच या दिवशी बुध, शुक्र आणि गुरू त्रिग्रही योग निर्माण करणार आहेत. धनत्रयोदशीच्या दिवशी निर्माण होणार हा संयोग काही राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धनत्रयोदशीला ‘या’ राशी होणार मालामाल

मेष

धनत्रयोदशीच्या दिवशी निर्माण होणारा त्रिग्रही योग मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या उत्साहात वाढ होईल. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबात सुख-शांती निर्माण होईल.

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींना त्रिग्रही योग खूप अनुकूल ठरेल. या काळात या काळात फक्त तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. समाजात मान-सन्मान वाढेल.

तूळ

धनत्रयोदशीला निर्माण होणारा त्रिग्रही योग तूळ राशीच्या व्यक्तींसाठी खूप शुभ ठरेल. या काळात आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. नव्या वस्तू खरेदी कराल. भौतिक सुख प्राप्त होईल. मित्रांबरोबर दूरचे प्रवास घडतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे.

धनु

धनु राशीच्या व्यक्तींना धनत्रयोदशीच्या दिवशी निर्माण होणारा त्रिग्रही योग अत्यंत भाग्यकारी ठरणार आहे. या काळात तुम्हाला मेहनतीचे फळ मिळेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. वैवाहिक जीवन सुखमय राहिल.

हेही वाचा: ‘या’ ५ राशींची होणार चांदी; १३ दिवसांनंतर देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूंची होणार कृपा, मिळणार बक्कळ पैसा

मीन

मीन राशीच्या व्यक्तींसाठी धनत्रयोदशीचा दिवस अत्यंत भाग्यकारी ठरेल. या काळात मेहनतीचे फळ मिळेल. आरोग्य चांगले राहिल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमची आर्थिक चणचण दूर होईल, कर्ज कमी होण्यास मदत होईल. उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhanteras 24 trigrahi yoga this 5 zodiac sign person will earn money respect and material happiness sap