Transit of Mercury: ज्योतिषशास्त्रात नवग्रहातील बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार म्हटले जाते. २५ एप्रिल रोजी बुध ग्रहाने मेष राशीत प्रवेश केला होता, जो ५ ऑगस्टपर्यंत या राशीत राहणार आहे. बुधाचे हे राशीपरिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप खास ठरले. उरलेले ७६ दिवसदेखील हे राशीपरिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप खास ठरणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह वाणी, विवेक, बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह मजबूत असतो त्या व्यक्तीला या सर्व गोष्टी प्राप्त होतात, त्यामुळे बुधाचे मेष राशीतील राशीपरिवर्तनदेखील काही राशींसाठी खूप लाभकारी सिद्ध होणार आहे.

कर्क

बुधाच्या मेष राशीतील राशीपरिवर्तनाने कर्क राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक बदल होतील. पुढचे ७६ दिवस तुम्हाला अनेक बदल पाहायला मिळतील. नोकरी, व्यवसायात प्रगती होऊ शकते. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. या काळात तुमच्या बोलण्याने सर्वांना आकर्षित कराल. कला, साहित्य क्षेत्रात यश मिळेल.

सिंह

बुध ग्रहाचा मेष राशीतील प्रवेश सिंह राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर असेल. पुढचे ७६ दिवस तुमच्यासाठी खास असतील. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. केवळ वाणीवर नियंत्रण ठेवा. मेहनतीचे फळ मिळेल. विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. शिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील.

हेही वाचा: पैसा, पद अन् सुख-समृद्धी येणार; २०२५ मध्ये गुरूच्या मिथुन राशीतील प्रवेशाने ‘या’ तीन राशींचा होणार भाग्योदय

धनु

बुध ग्रहाच्या मेष राशीतील राशीपरिवर्तनाने धनु राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडून येतील. पुढचे ७६ दिवस तुम्हाला करिअरमध्ये यश मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. वैवाहिक आयुष्य सुखमय राहील. आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळू शकेल.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)