Guru planet transit: ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला ज्ञान, धन, सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरू ग्रह मजबूत आहे. त्यांना आयुष्यात नेहमी या गोष्टी प्राप्त होतात. ज्योतिषशास्त्रानुसार गुरू ग्रहाचे जवळपास १३ महिन्यांनी राशी परिवर्तन होते. सध्या वृषभ राशीत गुरू ग्रह असून, मे २०२५ पर्यंत या राशीत असतील. त्यानंतर गुरू ग्रह मिथुन राशीमध्ये प्रवेश करतील; ज्यामुळे काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकेल.
वृषभ
गुरू ग्रहाचे राशी परिवर्तन वृषभ राशीतून मिथुन राशीत होईल; ज्याचा प्रभाव वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी लाभकारी सिद्ध होईल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. कुटुंबीयांचे संबंध चांगले होतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल.
मिथुन
मिथुन राशीतच गुरू ग्रहाचे राशी परिवर्तन होणार आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात व्यापाऱ्यांना अधिक लाभ होण्याची शक्यता आहे. करिअरसंबंधित समस्या दूर होऊ शकतात. उत्पनाचे नवीन स्रोत मिळू शकतील. मेहनतीवर लक्ष केंद्रित करा, आनंदी वार्ता कानी पडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे.
सिंह
सिंह राशीच्या व्यक्तींनादेखील गुरू ग्रहाचे राशी परिवर्तन खूप शुभ परिणाम देईल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. तीर्थक्षेत्रांना भेटी द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)