20 February 2025 Horoscope : २० फेब्रुवारी २०२५ रोजी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. सप्तमी तिथी सकाळी ९ वाजून ५९ मिनिटांपर्यंत चालेल, त्यानंतर अष्टमी तिथी सुरू होईल. आज दुपारी ११ वाजून ३४ मिनिटांपर्यंत ध्रुव योग जुळून येईल. याशिवाय विशाखा नक्षत्र आज दुपारी दीड वाजेपर्यंत जागृत राहणार आहे. राहू काळ १ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजपर्यंत असणार आहे. याशिवाय आज कालाष्टमीही आहे आणि आज श्री संत गजानन महाराज यांचा प्रगटदिन आहे. तर आजचा शुभ दिवस तुमच्या राशीसाठी काय घेऊन आला आहे हे आपण जाणून घेऊया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२० फेब्रुवारी पंचांग व राशिभविष्य:

मेष:- सर्वांशी मिळून-मिसळून वागाल. उत्तम व्यक्तिमत्व जपाल. नवीन गोष्टीत रस घ्याल. आपला छंद उत्तमरीत्या जपाल. वैवाहिक सौख्य वाढीस लागेल.

वृषभ:- मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. काहीशी गुप्तता बाळगाल. आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्याल. स्त्रीवर्गापासून सावध राहावे. उत्तम व्यावसायिक लाभ होईल.

मिथुन:- मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. नवीन वाहन घेण्याचा विचार कराल. तुमची समाजप्रियता वाढीस लागेल. मित्रांचा गोतावळा जमवाल. उच्च रहाणीमानाची आवड दर्शवाल.

कर्क:- दिवस आळसात घालवाल. औद्योगिक वातावरण चांगले राहील. सौंदर्य प्रसाधने खरेदी कराल. अंगीभूत कलागुण वाढीस लागतील. चैनीकडे कल राहील.

सिंह:- कलेला पोषक वातावरण लाभेल. आवडीचे साहित्य वाचायला मिळेल. लेखकांना कलागुण विकसित करता येतील. घरात टापटीप ठेवाल. कामाची योग्य पोचपावती मिळेल.

कन्या:- सांपत्तिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल. सासुरवाडीची मदत मिळेल. बौद्धिक कामात गतीमानता येईल. धार्मिक कामात हातभार लावाल. कामाचा दर्जा सुधाराल.

तूळ:- अचानक धनलाभ संभवतो. पत्नीचे लाडिक हट्ट पुरवाल. महिलांना उत्तम गृहिणीपदाचा मान मिळेल. एकमेकातील समजूतदारपणा वाढेल. कलेच्या क्षेत्रात प्रगती करता येईल.

वृश्चिक:- भागिदारीतून चांगली कमाई होईल. इतरांच्या विश्वासावर खरे उतरावे. योग्य संधीची वाट पहावी. नातेवाईकांकडून मदत मिळेल. हाताखालील लोकांकडून सहकार्य मिळेल.

धनू:- कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. करमणुकीचे कार्यक्रम पाहाल. आत्मिक समाधान मिळेल. सारासार विचार करून निर्णय घ्यावा.

मकर:- आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरगुती गोष्टींमध्ये रमून जाल. क्षुल्लक गोष्टींमधील कटुता टाळण्याचा प्रयत्न कराल. सर्वांशी प्रेमाने वागाल.

कुंभ:- हस्तकलेसाठी वेळ काढा. प्रवासाची हौस भागवाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवा. सौंदर्यवादी दृष्टीकोन बाळगावा.

मीन:- मोठ्या लोकांच्या ओळखीने कामे होतील. आर्थिक स्थैर्य जपण्याचा प्रयत्न कराल. गायन कलेचे कौतुक केले जाईल. मूल्यवान वस्तू खरेदी केल्या जातील. कामातील बदल लक्षात घ्यावेत.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gajanan maharaj pragatdin vishesh rashi bhavishya how will start mesh to meen day read marathi horoscope asp