Gajkesari Rajyog: वैदिक ज्योतिषानुसार, नवग्रहांमध्ये चंद्र हा सर्वात वेगाने चालणारा ग्रह मानला जातो. तो एका राशीत सुमारे दीड ते दोन दिवस राहतो. त्यामुळे तो नेहमीच कुठल्या ना कुठल्या ग्रहासोबत युती करतो आणि त्यामुळे शुभ किंवा अशुभ योग तयार होतात. आता लवकरच चंद्र आणि गुरु यांची युती होणार आहे, ज्यामुळे शक्तिशाली गजकेसरी राजयोग तयार होईल.
वैदिक ज्योतिषानुसार, १२ ऑक्टोबर रोजी पहाटे २ वाजून २४ मिनिटांनी चंद्र मिथुन राशीत प्रवेश करेल. तिथे आधीच गुरु विराजमान असल्यामुळे गुरु आणि चंद्र यांच्या युतीने गजकेसरी राजयोग बनेल. या राजयोगामुळे काही राशींना नशिबाची साथ मिळेल. तसेच, बऱ्याच काळापासून अडकलेली कामे पूर्ण होतील आणि धन-धान्याची वाढ होईल. चला, तर मग जाणून घेऊ या त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत.
गजकेसरी राजयोग म्हणजे काय?
ज्योतिष शास्त्रानुसार, गजकेसरी राजयोग म्हणजे सिंह हा हत्तीच्या पाठीवर बसलेला असा अर्थ होतो. जेव्हा हा योग तयार होतो, तेव्हा व्यक्ती खूप बलवान, निडर, धाडसी आणि प्रभावशाली बनते. हा योग तेव्हा तयार होतो जेव्हा धनाचे कारक ग्रह गुरु आणि मनाचे कारक चंद्र यांची युती होते किंवा त्यांचा एकमेकांवर विशेष प्रभाव पडतो.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
या राशीत गुरु आणि चंद्र यांची युती लग्न भावात होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसू शकतात. या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि पैशाचे नवे मार्ग खुलतील. याशिवाय नेतृत्वाची क्षमता वाढेल, त्यामुळे तुम्ही कामाच्या ठिकाणी चांगले निर्णय घेऊ शकाल आणि इतरांना मार्गदर्शनही करू शकाल. आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही तुमचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. तुम्ही तुमच्या भविष्यासाठी काही चांगले विचार करू शकाल. विचारपूर्वक आणि शहाणपणाने पुढे गेलात, तर नक्कीच यश मिळेल.
धनु राशी (Sagittarius Horoscope)
या राशीत गुरु आणि चंद्र यांची युती सप्तम भावात होणार आहे. ही युती या राशीच्या लोकांसाठी प्रत्येक क्षेत्रात मोठ्या यशाचे आणि जलद प्रगतीचे संकेत देणारी आहे. करिअरच्या दृष्टीने हा काळ अतिशय शुभ ठरेल आणि गजकेसरी राजयोगामुळे तुमच्या प्रयत्नांना पूर्ण यश मिळेल. व्यवसायातही या काळात चांगला फायदा होण्याची शक्यता आहे, विशेषतः भागीदारीत चालणाऱ्या व्यवसायात नफा दुप्पट होऊ शकतो.
तसेच प्रभावशाली आणि यशस्वी लोकांशी तुमचे संबंध अधिक मजबूत होतील, ज्याचा फायदा तुमच्या व्यवसाय आणि सामाजिक प्रतिष्ठेला होईल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी खूपच अनुकूल आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत सुख-शांती राहील आणि वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात सकारात्मक बदल दिसतील. एकूणच, हा काळ तुमच्यासाठी यश, समृद्धी आणि संतुलन घेऊन येणारा आहे.
तूळ राशी (Libra Horoscope)
या राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीत गुरु आणि चंद्र यांची युती भाग्य भावात होत आहे, ज्यामुळे या राशीच्या लोकांना केवळ प्रसिद्धीच नाही तर समाजात मान-सन्मानही मिळेल. जीवनात नवीन संधींचे दरवाजे उघडू शकतात आणि बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या अडचणींचे निराकरण होऊ शकते. करिअरच्या क्षेत्रात सतत प्रगती आणि लाभ होण्याची शक्यता राहील.
तुम्ही व्यवसायात किंवा कामाच्या ठिकाणी जे नवीन विचार किंवा योजना आणाल, ते यशस्वी ठरू शकतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. कुटुंब आणि मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळाल्यामुळे तुम्ही प्रत्येक आव्हानाला आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकाल आणि जीवनात यशाचे नवे टप्पे गाठू शकाल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)