Gajkesari Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो. चंद्र एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. अशा स्थितीत चंद्र कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी जोडला जातो. ज्यामुळे शुभ किंवा अशुभ योग निर्माण होतात. दरम्यान, १८ ऑक्टोबर रोजी गुरू रात्री ९ वाजून ३९ मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करेल आणि ५ डिसेंबरपर्यंत याच राशीत राहील. या काळात गुरूची कोणत्याना कोणत्यातरी ग्रहाबरोबर युती निर्माण होईल. याच काळात गुरूची चंद्राबरोबर युती निर्माण होईल. ज्यामुळे गजकेसरी राजयोग निर्माण होईल.

पंचांगानुसार, चंद्र १० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजून २ मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करेल जो या राशीत १२ नोव्हेंबरपर्यंत राहील. ५४ तासांसाठी निर्माण झालेली ही युती १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होतील.

गजकेसरी राजयोग तीन राशींसाठी घेऊन येणार सुखाचे दिवस

मेष (Mesh Rashi)

मेष राशीसाठी गजकेसरी राजयोग फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल.

कर्क (Kark Rashi)

कर्क राशीसाठी गजकेसरी राजयोग लाभदायी ठरेल. या काळात तुमच्यावर खूप सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे.

मीन (Meen Rashi)

मीन राशीच्या व्यक्तींसाठी गजकेसरी राजयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबात आनंदी आनंद असेल. आकस्मिक धनलाभ होतील. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)