Lucky Zodiac Sign: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या राशी व नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव हा कमी अधिक स्वरूपात सर्वच राशींवर दिसून येऊ शकतो. अशातच उद्याचा दिवस हा ग्रहांच्या स्थितीमुळे तसेच शनी जयंतीनिमित्त जुळून आलेल्या दुर्मिळ योगांमुळे अत्यंत विशेष ठरणार आहे. उद्या कलियुगातील न्यायाधिकारी शनिदेवाची जयंती आहे. योगायोगाने उद्याचा वार आहे शुक्रवार. शुक्र व शनीचे नाते मैत्रीपूर्ण असल्याने उद्याचा दिवस अगोदरच खास ठरत आहे. याशिवाय शनी ज्या राशीत अगदीच तिसऱ्या स्थानी प्रभावी आहे अशा मेषेत गुरु व चंद्राच्या युतीने गजकेसरी राजयोग तयार झालेला आहे. यासह शनी जयंतीला विशेष पाच राजयोग जुळून आले आहेत. एकंदरीतच ही स्थिती पाहता उद्याच्या दिवशी सर्वच राशींना काही ना काही प्रकारे लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार तीन अशा राशी आहेत ज्यांना उद्याच्या दिवसात प्रचंड फायद्याचे संकेत आहेत. या राशी कोणत्या व त्यांना काय लाभ होणार हे पाहूया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिथुन रास (Gemini Zodiac)

शनीच्या साडेसातीतून मुक्त झालेली रास म्हणजे मिथुन. यंदा मिथुन राशीला ‘आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे’ असे वातावरण अनुभवायला मिळणार आहे. गुरु व चंद्राच्या युतीने तयार झालेला गजकेसरी राजयोग अगोदरच आपल्या राशीसाठी प्रचंड मोठी गुंतवणुकीची संधी घेऊन येऊ शकतो. तर शनि जयंतीच्या निमित्ताने आपल्याला गुंतवणुकीचा नफा सुद्धा दहा पट अधिक होऊन मिळणार असल्याचे संकेत आहेत. नोकरदार मंडळींना कामाच्या ठिकाणी प्रचंड कौतुक झाल्याने कामाला वेगळा हुरूप येऊ शकतो. तुमच्या कामाच्या निमित्ताने एखाद्या परदेश वारीची नामी संधी चालून येऊ शकते. बुद्धिमत्तेचा कस लागेल अशी एखादी स्थिती समोर येऊ शकते पण यातून योग्यमार्ग काढल्यास तुमची चांदी होण्याची पूर्ण शक्यता आहे.

तूळ राशि (Libra Zodiac)

लक्ष्मी व विष्णूची कृपा प्राप्त असलेली रास म्हणजे तूळ राशी. तुमच्या राशीच्या गोचर कुंडलीमध्ये गजकेसरी राजयोग हा नशिबाचे बंद दार उघडण्याचे काम करू शकतो. येत्या काळात तुम्हाला सर्व महत्त्वाची कामे मार्गी लावता येतील. व्यावसायिकांना अत्यंत महत्त्वाचे असे काही संपर्क मिळू शकतात. तूळ राशीचे स्वामी शुक्रदेव आहेत.वर म्हंटल्याप्रमाणे शनी व शुक्राची युती बहुतांश वेळा लाभदायक ठरत असते यामुळे येत्या अडीच वर्षात तूळ राशीला सुद्धा मोठ्या प्रमाणात सुख व समाधान अनुभवता येऊ शकते. तुम्हाला विवाहाचे योग सुद्धा असल्याचे तुमची कुंडली सांगत आहे. अनपेक्षित रूपात प्रेमाचा अनुभव घेता येऊ शकतो.

हे ही वाचा<< शनीकृपेने ‘या’ ५ राशींना अडीच वर्षे आनंदी आनंद? उद्यापासून गडगंज श्रीमंती व धनलाभाने मिळू शकते नशिबाला कलाटणी

मेष रास (Aries Zodiac)

वर म्हटल्यानुसार मेष राशीत शनिदेव हे सध्या उच्च स्थानी व तिसऱ्या प्रभावशाली ठिकाणी स्थिर आहेत. याच राशीत गजकेसरी राजयोग सुद्धा तयार झाला आहे. लक्ष्मीचा व सरस्वतीचा वरदहस्त असणारी अशी तुमची रास आहे. तुम्हाला येत्या काळात अभ्यासातून अनेक नव्या गोष्टी उलगडू लागतील तुमच्या नियमित मर्यादेच्या कक्षा ओलांडून पुढे जाण्याची संधी मिळू शकते. तुम्हाला नवीन वास्तूचा सहवास लाभेल यातून तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलू शकतो. वेळ व पैशांची योग्य मार्गाने गुंतवणूक केल्यास तुम्हाला दहा पट उत्तम रिझल्ट दिसू शकतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guru chandra yuti with shani jayanti makes lakshmi narayan yog these three zodiac signs can earn wealth money astrology svs