Guru in mrigashira nakshatra: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला ज्ञान, सौभाग्य आणि सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते. देवगुरू बृहस्पति जवळपास एका वर्षानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. तसेच ठराविक वेळेनंतर नक्षत्र परिवर्तनही करतात. सध्या गुरू वृषभ राशीत आणि मृगशिरा नक्षत्रामध्ये असून गुरू २२ नोव्हेंबरपर्यंत मृगशिरा नक्षत्रामध्ये उपस्थित राहील. तसेच येत्या २२ सप्टेंबर रोजी गुरू मृगशिरा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करेल. ज्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्योतिषशास्त्रानुसार गुरू २२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजून १४ मिनिटांनी मृगशिरा नक्षत्राच्या दुसऱ्य चरणात प्रवेश करेल. या चरणात गुरू २६ ऑक्टोंबरपर्यंत राहील. हे नक्षत्र २७ नक्षत्रांमध्ये पाचव्या क्रमांकाचे नक्षत्र आहे. तसेच मंगळ या नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे.

दोन राशींच्या आयुष्यात येणार आनंदी आनंद

मेष

गुरूचा मृगशिरा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणातील प्रवेश मेष राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आनंदी आनंद घेऊन येईल. या व्यक्तींना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबीयांबरोबर आनंदाचे क्षण व्यक्तीत कराल. या काळात समाजात मान-सन्मान वाढेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत सापडतील. नोकरी करणाऱ्यांना प्रत्येक कामात यश मिळेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. परदेशात जाण्याची इच्छा असणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होईल. मित्रांबरोबर चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल.

हेही वाचा: शनी देणार बक्कळ पैसा; मूळ त्रिकोण राशीतील उपस्थिती ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना देणार पैसा, प्रतिष्ठा आणि भौतिक सुख

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मृगशिरा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणातील प्रवेश खूप आनंद देणारा असेल. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. अचानक धनलाभ होईल, या काळात वृश्चिक राशीच्या व्यक्तींना अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. भौतिक सुखाची प्राप्ती होईल. तुमचे आरोग्य चांगले राहील. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश, पदोन्नतीही मिळेल.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guru gochar 24 after eight days under the influence of jupiter these two zodiac signs will get a new job and respect sap