Hans Malavya Rajyog: वैदिक ज्योतिषात शुक्र ग्रहाला ऐशोआराम, भौतिक सुख, वैभव, पैसा, संगीत आणि कलेचा कारक मानले जाते. तर गुरु ग्रहाला समृद्धी, सात्विक पैसा, अध्यात्म, ज्योतिष आणि वैवाहिक सुखाचा कारक मानले जाते. त्यामुळे ज्यांच्या कुंडलीत हे दोन्ही ग्रह चांगल्या स्थितीत असतात, त्यांना या गोष्टींशी संबंधित त्रास सहन करावा लागत नाही.

जेव्हा हे दोन्ही ग्रह आपल्या उच्च किंवा स्वराशीत असतात, तेव्हा हंस आणि मालव्य राजयोग तयार होतो. नोव्हेंबरमध्ये शुक्र आणि गुरु स्वतःच्या स्वराशीत असणार आहेत, त्यामुळे हंस आणि मालव्य राजयोग होणार आहे. यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. त्याचबरोबर या राशींना अचानक धनलाभ आणि प्रगतीची संधी मिळू शकते. चला पाहूया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…

मिथुन राशी (Gemini Horoscope)

मालव्य आणि हंस राजयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो. कारण शुक्र ग्रह तुमच्या गोचर कुंडलीत पंचम भावात उच्चस्थ असतील आणि गुरु दुसऱ्या भावात असतील. त्यामुळे या काळात तुम्हाला कामात यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळू शकते. प्रमोशन आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. संततीसंबंधी चांगली बातमी मिळू शकते. तसेच ज्यांना मूल हवे आहे त्यांना या काळात मूल प्राप्त होऊ शकते.

मकर राशी (Capricorn Horoscope)

तुमच्यासाठी हंस आणि मालव्य राजयोग तयार होणे फायदेशीर ठरू शकते. कारण हंस राजयोग तुमच्या राशीपासून सप्तम भावात होणार आहे आणि मालव्य राजयोग इनकम भावात तयार होईल. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. गुंतवणुकीतूनही नफा मिळू शकतो. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. जोडीदाराची प्रगती होईल. तसेच अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात.

कन्या राशी (Virgo Horoscope)

तुमच्यासाठी मालव्य आणि हंस राजयोग तयार होणे शुभ ठरू शकते. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीपासून दुसऱ्या भावात असतील. त्यामुळे या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. काही व्यावसायिक करार होऊ शकतो. पार्टनरशिपमध्ये नवे काम सुरू करू शकता. या काळात तुम्ही परदेश प्रवासही करू शकता. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील, फक्त या संधीचा उपयोग करून घ्यावा लागेल. तसेच गुरु ग्रह तुमच्या राशीपासून इनकम आणि लाभ भावात असतील. त्यामुळे उत्पन्नात मोठी वाढ होईल आणि नवे उत्पन्नाचे मार्गही तयार होऊ शकतात.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)