Cancer, Leo and Virgo Rashifal 2024 : ज्योतिष्य शास्त्रनुसार २०२४ मध्ये कित्येक छोटे आणि मोठ्या ग्रहांच्या स्थितीमध्ये परिवर्तन होणार आहे ज्यामुळे वर्षाच्या सुरुवातीलाच बुध ग्रह मार्गी होणार आहे. त्याचबरोबर सुर्यदेव राशी परिवर्तन करणार आहे. तसेच मे महिन्यातच देवतांचा स्वामी गुरू वृष राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्याचबरोबर शनी देव वक्री होणार आहे ज्यामुळे सर्व राशींच्या लोकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. कर्क, सिंह आणि कन्या राशीच्या लोकांसाठी कसे असेल नवीन वर्ष चला जाणून घेऊ या….

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर्क राशीभविष्य २०२४

कर्क राशीच्या लोकांना २०२४ हे वर्ष आर्थिकदृष्ट्या शुभ ठरू शकते. तसेच, संशोधनात गुंतलेल्यांना २०२४ मध्ये चांगले यश मिळू शकते, परंतु आरोग्याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण शनीची ढय्या सुरू आहे.(ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा शनि कोणत्याही राशीच्या चौथ्या किंवा आठव्या स्थानी विराजमान होतो तेव्हा त्या स्थितीला ढैय्या असे म्हणतात) आणि शनिदेव या राशीतून आठव्या घरात प्रवेश करणार आहेत. ज्याला वय आणि गुप्त रोगांचे स्थान मानले जाते. त्यामुळे या वर्षी कर्क राशीच्या लोकांना पोट, दमा, खोकला आणि अॅसिडिटीच्या समस्या उद्भवू शकतात. मे महिन्यापर्यंत गुरु कर्क राशीत कर्म स्थानावर भ्रमण करेल. त्यामुळे यावेळी काम आणि व्यवसायात प्रगती होईल. व्यावसायिकांना चांगला फायदा होईल. मे नंतर, गुरु तुमच्या राशीच्या उत्पन्नाच्या ठिकाणी भ्रमण करेल. त्यामुळे उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते.

हेही वाचा – पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटमध्ये सीटची उशी झाली गायब! एअरहोस्टेस म्हणाली, “सीट खाली शोधा”

सिंह राशीभविष्य २०२४


वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांसाठी २०२४ हे वर्ष लाभदायक ठरू शकते. कारण शनिदेव या राशीच्या व्यक्तीच्या कुंडलीच्या सातव्या घरात भ्रमण करत आहेत. तसेच त्यांनी शश महापुरुष राजयोगाची निर्मिती केली आहे. त्यामुळे या वर्षी विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखाचे राहील. या राशींच्या व्यक्तीच्या जोडीदाराचीही प्रगती होऊ शकते. गुरु ग्रह मे महिन्यापर्यंत तुमच्या राशीच्या नवव्या घरात भ्रमण करेल. तसेच त्यानंतर आपण कर्म स्थानाचे दर्शन घेऊन भ्रमण करतील. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना कामात आणि व्यवसायात नशीब मिळेल. नोकरदारांनाही बढती मिळण्याची शक्यता आहे. तसेच, व्यावसायिकांना मे नंतर चांगली ऑर्डर मिळू शकते, ज्यामुळे नफा मिळेल. स्पर्धक विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळू शकते. या वर्षी या राशीच्या लोकांना परदेश प्रवास करू शकता.

हेही वाचा – धनुषच्या ‘Rowdy Baby’ गाण्यावर तरुणीने केला भन्नाट डान्स! व्हिडीओ पाहून साई पल्लवीची येईल आठवण!

कन्या राशी भविष्य २०२४

कन्या राशीच्या लोकांसाठी २०२४ हे वर्ष लाभदायक ठरू शकते. कारण शनिदेव या राशीच्या कुंडलीच्या सहाव्या घरात भ्रमण करत आहेत. त्यामुळे यावेळी तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळू शकते. या राशींच्या व्यक्तींना त्यांच्या योजनांमध्ये यश मिळू शकते. गुप्त शत्रूंविरोधात विजय होईल. काही आजारांपासूनही आराम मिळू शकतो. मे २०२४ पर्यंत या राशीपासून आठव्या घरात गुरु ग्रहाचे भ्रमण आहे. त्यामुळे संशोधनाशी संबंधित लोकांना या वर्षी फायदा होऊ शकतो. तसेच, मे नंतर, गुरु या राशीतून नवव्या घरात जाईल. त्यामुळे यावेळी नशीब तुमच्या पाठीशी असेल. तसेच, या वर्षी तुम्ही देश-विदेशात प्रवास करू शकता. धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमातही सहभागी होऊ शकता.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Horoscope 2024 rashifal 2024 how new year 2024 lucky for people of cancer leo and virgo rashifal 2023 according to astrology snk