Shani Sade Sati Last Phase Predictions: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीचा काळ वेगळा ठरतो. कधी दुर्दैवाची छाया येते तर कधी आकाश भरून सोन्यासारखा पाऊस पडतो. काही राशींसाठी पुढची दोन वर्ष इतकी अनुकूल जाणार आहेत की त्यांचा जीवनप्रवासच बदलून जाणार आहे. धन, मान, प्रतिष्ठा आणि सुखसोयींचा वर्षाव होणार हे नक्की. कोणत्या राशीच्या जीवनात सुख समृद्धीचा वर्षाव होणार आहे ते जाणून घेऊया…

ज्योतिषी सांगतात की, या काळात काहींच्या आयुष्यातील जुने अडथळे दूर होऊ शकतात. घर, गाडी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. बराच काळ अडकलेला पैसा हातात येऊन आणि गुंतवणुकीतून प्रचंड नफा होण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर नोकरीत पदोन्नती, पगारवाढ मिळेलच, पण व्यावसायिकांना नवे कॉन्ट्रॅक्ट आणि ग्राहक मिळून आर्थिक स्थिती आणखी चांगली होण्याची शक्यता आहे.

या काळात ‘चांदीच्या पायाचा शनी’ या शुभ योगामुळे नशीब दुप्पट वेगाने साथ देऊ शकते. चांदीचा पाया म्हणजे शनीदेव जेव्हा जन्मराशीतून दुसऱ्या, पाचव्या किंवा नवव्या भावात भ्रमण करतात तेव्हा निर्माण होणारा अत्यंत शुभ काळ. या स्थितीत अचानक धनलाभ होतो, प्रतिष्ठा वाढते आणि सामाजिक जीवनातही मानसन्मान मिळतो.

पण, एक गोष्ट मात्र लक्षात ठेवावी लागेल – या काळात खर्चसुद्धा वाढणार आहेत. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवले नाही तर मिळकतीइतकीच रक्कम निघून जाईल. त्यामुळे संयम आणि शहाणपणाने वागणे गरजेचे आहे. तरीसुद्धा एकंदरीत हा काळ सुख-समृद्धीने उजळून निघणार यात शंका नाही.

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेल्यांना अनपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना नवीन प्रकल्प मिळतील, तर नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.

आता सगळ्यांच्या मनात प्रश्न पडला असेल की हा चांगला काळ नक्की कोणत्या राशीसाठी आहे? कोण होणार पुढील दोन वर्षांत सर्वाधिक भाग्यवान?

उत्तर अगदी स्पष्ट आहे – हा अद्भुत काळ कुंभ राशीसाठी आहे!

२०२५ ते २०२७ या काळात कुंभ राशीवर शनी साडेसातीचा शेवटचा टप्पा असला, तरी चांदीच्या पायामुळे हा काळ सोनेरी ठरणार आहे. घर, गाडी, संपत्ती, पदोन्नती आणि सुखसोयी सगळं काही मिळणार, फक्त संयम आणि योग्य नियोजन गरजेचं.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)