Women are Controlling in a relationship: ज्योतिषशास्त्रामध्ये जन्मतारीख, वेळ व ठिकाण या गोष्टींचा अभ्यास करून प्रत्येक व्यक्तीची कुंडली काढली जाते. त्याव्यतिरिक्त १२ राशी, २७ नक्षत्रे, मूलांक, भाग्यांक, जन्म वार, जन्म महिना यांच्यावरून व्यक्तीचा स्वभाव, गुण, अवगुणांबद्दल भाष्य केले जाते. दरम्यान, आज आपण १२ राशीतील अशा काही महिलांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या आपल्या पतीवर हुकूमत गाजवण्यात पटाईत असतात. या राशीच्या महिला पतीला आपल्या तालावर नाचण्यास भाग पाडतात.

‘या’ राशीच्या महिला पतीवर हुकूमत गाजवतात

मेष

मेष या राशीचा स्वामी मंगळ ग्रह असून मंगळ हा ग्रह साहस, ऊर्जेचा कारक ग्रह आहे, त्यामुळे मंगळाचे काही गुण या राशीच्या लोकांमध्येही पाहायला मिळतात. ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या महिला आपल्या पतीसाठी भाग्यशाली असतात, परंतु या नेहमी आपल्या पतीला स्वतःच्या मुठीत ठेवतात. यांच्या पतीचे यांच्यापुढे काहीही चालत नाही. बायको म्हणेल तीच पूर्व दिशा असे मानून यांना चालावे लागते. या राशीच्या महिलांचे लग्नाआधीचे आयुष्य खूप खडतर असते, परंतु लग्नानंतर त्यांचा भाग्योदय होतो.

सिंह

सिंह राशीचा स्वामी सूर्य असून सूर्य हा ग्रहांचा राजा आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांमध्येही इतरांचे नेतृत्व करण्याचे गुण पाहायला मिळतात. या राशीच्या महिला आपल्या पतीसह सासरकडच्यांवरदेखील हुकूमत गाजवतात. या राशीच्या महिलांना सगळ्यांनी आपलेच ऐकावे असे वाटते. त्यांच्यातील या दुर्गुणामुळे अनेकदा लोकांच्या रागाचा त्यांना सामना करावा लागतो.

वृश्चिक

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असून मंगळाच्या प्रभावाने या राशीच्या व्यक्तीदेखील साहसी, निर्भीड आणि आत्मविश्वासू असतात. परंतु, त्यांच्यातील हे गुण कधी कधी त्यांच्यासाठी घातक ठरू शकतात. या राशीच्या महिला अनेकदा आपल्या पतीला मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करतात. परंतु, याच गोष्टीवरून त्यांच्या पतीबरोबर त्यांचे वाद होऊ शकतात.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)