Ketu Mangal Yuti 2025 : ग्रहांचे सेनापती आणि भूमिपुत्र मंगळ अग्नि तत्वाचा ग्रह आहे. हा ग्रह धाडस, पराक्रम, भूमि, विवाहाचा कारक आहे. मंगळ मेष आणि वृश्चिक राशीचे स्वामी आहेत. तसेच केतू ग्रह मायावी आणि केतू ग्रह आहे. ७ जून ला मंगळ ग्रहाने गोचर करून सिंह राशीमध्ये प्रवेश केलाआहे. या ठिकाणी आधीच केतू विराजमान आहे.
अशात दोन उग्र ग्रहाचे सूर्याची राशी सिंहमध्ये एकत्र येणे अत्यंत शक्तिशाली योग निर्माण होतो. या योग ला कुज केतू योग म्हणतात. हा योग काही राशींसाठी अत्यंत धोकादायक तर काही राशींच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. मंगळ ग्रह २८ जुलैला सिंह राशीमधून बाहेर पडून कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तेव्हा हा योग समाप्त होणार.

हा अशुभ योग चार राशीच्या लोकांना शुभ फळ देईल आणि त्यांचे नशीब चमकू शकते. या लोकांच्या करिअरमध्ये प्रमोशन तसेच पगार वाढीचे योग दिसून येत आहे. २८ जुलैला मंगळ केतुची युती तुटल्याने या लोकांना मोठा लाभ होऊ शकतो.

वृषभ राशी

या राशीच्या लोकांना २८ जुलै पूर्वी प्रमोशन मिळू शकते. पगारात मोठा फायदा होण्याचा योग आहे. या लोकांना पदासह सन्मान मिळू शकतो. व्यक्तित्वाचा प्रभाव वाढू शकतो. बँक बॅलेन्स वाढणार आहे. अविवाहित लोकांना जोडीदार मिळू शकतो.

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांसाठी कुजकेतु योग नोकरी आणि व्यवसायात मोठा लाभ देऊ शकतात. या लोकांचे वाढलेला धाडसीपणा या लोकांना आव्हानांशी लढण्यास मदत करू शकतो. तसेच समाजात प्रतिष्ठा देईल. लोक यांचे कौतुक करतील.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीचे स्वामी ग्रह मंगळ आहे आणि या राशीच्या लोकांवर याची विशेष कृपा दिसून येते. मंगळ केतुची युती अनेक प्रकरणात वृश्चिक राशीच्या लोकांना लाभ देऊ शकते. करिअरमध्ये मजबुती येईल. धन समृद्धी वाढणार. नशीबाची साथ मिळेन.

मकर राशी

मकर राशीच्या लोकांसाठी मंगळ केतुची युती आर्थिक प्रगती देणारी ठरू शकते. जुन्या गुंतवणूकीतून लाभ मिळू शकतो. नवीन गुंतवणूक करण्यासाठी ही वेळ उत्तम नाही. नवीन प्रोजेक्ट सुरू करू शकता. समाजात मान सन्मान मिळणार.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)