Laxmi Narayan Yog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध हा व्यवसाय, बुद्धिमत्ता, एकाग्रता, बौद्धिक क्षमतेचा कारक ग्रह मानला जातो; तर शुक्र हा आनंद, समृद्धी, प्रेम, आकर्षण, आदर, विलासिता यांचा कारक मानला जातो. अशा परिस्थितीत या दोन्ही ग्रहांच्या स्थितीत होणारा बदल १२ राशींच्या लोकांच्या जीवनावर निश्चितच कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम करतो. अशात राक्षसांचा गुरू शुक्राने मीन राशीत प्रवेश केला आहे. तसेच, फेब्रुवारी महिन्यात बुध ग्रहदेखील या राशीत प्रवेश करील. दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे लक्ष्मीनारायण राजयोग तयार होत आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या लोकांवर देवी लक्ष्मीची विशेष कृपादृष्टी राहील. पण, लक्ष्मीनारायण योग कोणत्या राशींसाठी फायदेशीर ठरू शकतो ते जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धनाचा कर्ता असलेल्या शुक्राने २८ जानेवारी रोजी मीन राशीत प्रवेश केला असून, तो ३१ मेपर्यंत त्या राशीत राहील. तर दुसरीकडे बुद्धीचा कर्ता बुध ग्रह २७ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजून ४६ मिनिटांनी या राशीत प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत बुध आणि शुक्र यांच्या युतीमुळे लक्ष्मीनारायण योग तयार होत आहे. त्यामुळे खालील तीन राशींच्या लोकांना ७ मे २०२५ पर्यंत शुभ काळ असणार आहे.

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना खूप खास असेल. या राशीच्या लोकांसाठी लक्ष्मीनारायण योग आनंद घेऊन येणार आहे. त्यामुळे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. सुख, संपत्ती व समृद्धीमध्ये वाढ होऊ शकते. वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. त्यासह आता तुम्हाला तुमच्या मागील गुंतवणुकीतून चांगली रक्कम मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांनाही मोठे फायदे मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला व्यवसायात यश मिळू शकते आणि त्याचबरोबर मोठ्या आर्थिक लाभाचीही शक्यता आहे. समाजात आदर वाढेल.

मिथुन

लक्ष्मीनारायण योग मिथुन राशीच्या लोकांसाठीही खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांना प्रचंड संपत्तीचा लाभ होऊ शकतो. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकते. तुमचा कल अध्यात्माकडेही असू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. त्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध सुधारतील; ज्यामुळे तुमच्या करिअरला चालना मिळू शकते.

धनू

धनू राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनात भौतिक सुख मिळू शकते. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांचे वाहन, घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. उत्पन्नाचे अनेक स्रोत उपलब्ध होऊ शकतात. त्यासह आर्थिक गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. तुमचे तुमच्या पालकांशी असलेले संबंध सुधारतील. त्यामुळे कुटुंबातील वातावरणही आनंदी असेल.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laxmi narayan yog 2025 budh shukra gochar 2025 venus and mercury conjuction make lakshmi narayan yog these 3 zodiac sign will be shine earn more money sjr