Ganesh Jayanti 2025 Date, Time Shubh muhurat And Puja Vidhi: हिंदू धर्मात गणपतीला विशेष स्थान आहे. प्रत्येक मंगल अन् शुभ कार्य करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा केली जाते. हिंदू पंचागानुसार, दरवर्षी माघ महिन्याच्या शुल्क पक्षाच्या चतुर्थीला जयंती साजरी केली जाते, ज्याला माघी गणेश जयंती (Maghi Ganesh Jayanti 2025) असे म्हणतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माघ महिन्यातील गणेश जयंतीला माघ विनायक चतुर्थी, वरद चतुर्थी किंवा गणेश जयंती असेही म्हटले जाते. असेही म्हटले जाते. या दिवशी भक्तगण श्रीगणेशाची विधीपूर्वक पूजा आराधना करतात. गणपती बाप्पाकडे सुख- समृद्धीसाठी प्रार्थना करतात. पण, या वर्षी गणेश जयंती कोणत्या तारखेला येत आहे आणि त्याच्या पूजेसाठी कोणता शुभ मुहूर्त असेल ते जाणून घेऊया.

माघी गणेश जयंती तारीख (Maghi Ganesh Jayanti 2025 Date)

हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजून ३८ मिनिटांनी सुरू होत आहे, तर २ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजून १४ मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त राहील. यामुळे माघी गणेश जयंती शनिवारी म्हणजे १ फेब्रुवारीच्या दिवशी साजरी केली जाणार आहे. या काळात भगवान गणेशाची विधीवत पूजा केली जाईल.

माघी गणेश जयंती शुभ मूहुर्त (Maghi Ganesh Jayanti 2025 Shubh Muhurat)

माघी गणेश जयंती १ फेब्रुवारी रोजी साजरी होणार आहे. यावेळी मध्यान्ह गणेश पूजेची वेळ सकाळी ११ वाजून ३८ मिनिटांनी सुरू होईल ते दुपारी १ वाजून ४० मिनिटांपर्यंत असेल, म्हणजेच गणरायाची पूजा करण्यासाठी २ तास २ मिनिटांचा शुभ मुहूर्त असेल. या काळात तुम्ही गणेशाची पूजा करू शकता.

माघी गणेश जयंती २०२५ मंत्र (Ganesh Jayanti 2025 Mantra)

ॐ गं गणपतये नमः
ॐ श्रीं गं सौभ्याय गणपतये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा
ॐ हस्ति पिशाचि लिखे स्वाहा
ॐ गं क्षिप्रप्रसादनाय नमः
ॐ गणेश ऋणं छिन्धि वरेण्यं हुं नमः फट
गजाननाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्
श्री वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व-कार्येशु सर्वदा
गणपतिर्विघ्नराजो लम्बतुण्डो गजाननः
विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धितायं
अमेयाय च हेरंब परशुधारकाय ते। मूषक वाहनायैव विश्वेशाय नमो नमः

माघी गणेश जयंती आणि गणेश जयंतीमध्ये फरक काय? (Difference Between Maghi Ganesh Jayanti And Ganesh Chaturthi)

माघी गणेश जयंती (Maghi Ganesh Jayanti)

गणेश पुराणानुसार, माघ शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते. या दिवशी गणपतीचा जन्म झाला असे मानण्यात येते. गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी म्हणतात. षोडशोपचार गणेशपूजन करून तिळमिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करतात. कुंदफुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात, म्हणून या चतुर्थीला ‘तिलकुंद चतुर्थी’ असेही म्हणतात. या दिवशी ढुंढिराज गणेश रूपाची पूजा करावी असे सांगितले जाते. काही ठिकाणी गणेश चतुर्थीप्रमाणे दीड ते पाच दिवस गणेश जयंती साजरी करण्यात येते.

गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi)

आषाढ महिन्यात शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्चाथीचा उत्सव येतो. या दिवशी श्री गणेशाची स्थापना केली जाते. आषाढ महिन्यातील हा उत्सव १० किंवा १२ दिवसांचा असतो.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maghi ganesh jayanti 2025 date time shubh muhurat puja vidhi importance why we celebrate ganesh jayanti know the resaon in marathi ganpati mantra sjr