Mangal And Chandra Yuti in kark: ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो एका राशीमध्ये जवळपास अडीच दिवस राहतो. त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते. या युतीचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो. येत्या काही तासांमध्ये चंद्र, मंगळ ग्रहाबरोबर महालक्ष्मी राजयोग निर्माण करत आहे. हा योग काही राशींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंचांगानुसार, चंद्र ५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजून २४ मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश केला. जो ८ एप्रिलपर्यंत या राशीत राहील. तसेच ३ एप्रिल रोजी मंगळाने कर्क राशीत प्रवेश केला आहे. ज्यामुळे कर्क राशीमध्ये महालक्ष्मी योग निर्माण होत आहे. ज्याच्या प्रभावाने काही राशींना धनलाभ होईल.

‘या’ तीन राशींचे नशीब फळफळणार

मिथुन (Gemini)

मिथुन राशीच्या व्यक्तींना महालक्ष्मी योगामुळे खूप शुभ परिणाम पाहायला मिळतील. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल.

वृश्चिक (Scorpio)

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी देखील हा योग खूप चांगले बदल घेऊन येईल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल.

मकर (Capricorn)

चंद्र आणि मंगळ ग्रहाची युती मकर राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. सरकारी कामात मदत मिळेल. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahalaxmi yog mars and moon yuti in cancer zodic theree sign get live good life and money sap