When Is Bhogi, Makar Sankranti & Kinkrant 2023: मकर संक्रांती दरवर्षी पौष महिन्यात येत असली तरी याची तिथी मात्र निश्चीत नसते. मकर संक्रांती तिथी कधी १४ तारखेला तर कधी १५ तारखेला येत असते. दर ७६ वर्षांनी ही तारीख एक दिवसाने पुढे जाते. काही वर्षापूर्वी मकर संक्रांती १० जानेवारी रोजी साजरी होत असे. ही तारीख दर ६ वर्षांनी पुढे सरकत आता ती १४ जानेवारीपर्यंत आली आहे. काही वर्षांनी ती १५ जानेवारी देखील होईल. यंदा संक्रांत दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे व ईशान्य दिशेकडे पाहत आहे. या संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले आहे. केशराचा टिळा लावला आहे. जाईचे फूल हाती घेतले आहे. ती सर्प जातीची असून वयाने कुमारिका आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे ही वाचा<< Bornahan: लहान मुलांचे बोरन्हाण का केले जाते? जाणून घ्या यामागचे कारण

भोगी का साजरी केली जाते?

संक्रांतीच्या आधीच्या दिवशी भोगी असते. यानुसार १४ जानेवारीला भोगी साजरी होणार आहे. भोगी शब्द भुंज या धातूपासून बनला आहे. याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे. पौष महिन्यातील थंडी, नुकतीच झालेली अमावस्या या पार्श्वभूमीवर शेतात नवी पिकेदेखील येत असतात. ऐन थंडीच्या दिवसात येणाऱ्या स्निग्ध आणि उष्ण पदार्थांनी बनलेली भोगीची भाजी केली जाते. सोबतच बाजरीची तीळ घालून भाकरी केली जाते. असा चविष्ठ बेत या दिवशी केला जातो.

हे ही वाचा<< मकर संक्रांतीच्या आधी ‘या’ ३ राशींवर येणार मोठे संकट? १३ जानेवारी पर्यंत स्वतःची काळजी घ्या नाहीतर..

किंक्रांत कधी आहे?

१४ जानेवारी रोजी संक्रांती साजरी केली जाते. या दिवशी संक्राती या देवीने संकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, अशी मान्यता आहे. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते. किंकरआसुर नावाच्या राक्षसाचा वध या दिवशी केला होता, असं मानलं जातं. त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाहीत. या दिवशी कोणाशी वाद देखील घालू नये, असं म्हटलं जातं.

हे ही वाचा<< १४ की १५ जानेवारी? मकर संक्रांत कधी व कोणत्या रूपात येणार? काय केल्यास लाभते पुण्य? उल्हास गुप्तेंकडून जाणून घ्या

किंक्रांत कुणासाठी अशुभ?

आपल्याकडे मराठीत संक्रांत येणे म्हणजे वाईट संकट येणे या अर्थाने शब्दप्रयोग केला जातो. मात्र प्रत्येक वेळेस येणारी संक्रात ही वाईटच नसते. किंक्रांतीच्या दिवशी मात्र काही राशींनी काळजी घेणे आवश्यक असते. शनिदेव यंदा कुंभ राशीत १७ जानेवारीला प्रवेश करणार आहेत तर सूर्य व शनीची युती होणार आहे, शनीच्या प्रभावाने काही राशींना साडेसातीचा सामना करावा लागू शकतो. ज्योतिषशास्त्र हे संकेत देणारे असते. त्या संकेतांचा फायदा माणसाने आपल्या चांगल्यासाठी किंवा स्वतःवर संयम ठेवण्यासाठी वा काळजीपूर्वक वागण्यासाठी करायचा असतो. यादिवशी वाणी व कृतीतुन निसर्गाचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Makar sankranti bhogi kinkranti 2023 date time muhurta who will face loss and take care of money in coming three days svs