scorecardresearch

मकर संक्रांतीच्या आधी ‘या’ ३ राशींवर येणार मोठे संकट? १३ जानेवारी पर्यंत स्वतःची काळजी घ्या नाहीतर..

Budh Gochar 2023: बुध २ जानेवारीला धनु राशीत अस्त होईल आणि १३ जानेवारीला उदय होतील. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर राहील.

मकर संक्रांतीच्या आधी ‘या’ ३ राशींवर येणार मोठे संकट? १३ जानेवारी पर्यंत स्वतःची काळजी घ्या नाहीतर..
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

Budh Gochar 2023: जानेवारी महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलतील, १३ जानेवारीला बुध ग्रहाचा धनु राशीमध्ये उदय होईल, ज्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा स्थानिकांच्या जीवनावर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. ज्योतिषशास्त्रानुसार, बुध २ जानेवारी २०२३ पासून धनु राशीमध्ये अस्त झाला आहे आणि १३ जानेवारी २०२३ रोजी धनु राशीमध्ये उदय होईल. जाणून घेऊया बुध ग्रहाच्या हालचालींमुळे कोणत्या राशीच्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात.

वृषभ राशी

या राशीच्या लोकांसाठी बुध हा दुसऱ्या आणि पाचव्या घराचा स्वामी आहे. मूळ राशीच्या कुंडलीत आठव्या भावात बुधचा उदय होईल. या काळात तुम्हाला व्यवहारात अधिक खबरदारी घ्यावी लागेल, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागेल.

( हे ही वाचा: Makar Sankranti 2023: यंदा भोगी व किंक्रांतीत मोठा बदल! कुणासाठी अशुभ असणार किंक्रांत?)

कर्क राशी

बुधाचा कर्क राशीच्या कुंडलीत सहाव्या भावात उदय होईल. या काळात तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तसंच व्यवसाय आणि करिअरमध्ये काही अडचणी येऊ शकतात. या काळात तुमची प्रकृतीही बिघडू शकते आणि आरोग्यासाठी काही पैसे खर्च करावे लागतील.

( हे ही वाचा: १२ वर्षांनंतर गुरूदेवाचा सर्वात मोठा प्रवेश! ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, होऊ शकतो प्रचंड धनलाभ)

तूळ राशी

या राशीच्या लोकांसाठी बुध नवव्या आणि बाराव्या घराचा स्वामी आहे. राशीच्या लोकांच्या कुंडलीत बुध तिसऱ्या घरात जाईल. या काळात तुम्हाला नोकरी बदलायची असेल तर वेळ थांबावे लागेल. नोकरी बदलण्यासाठी हा काळ अनुकूल नाही. त्याचसोबत या काळात तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची देखील शक्यता दिसत आहे.

(वरील बातमी माहिती आणि गृहितके यांवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 19:42 IST

संबंधित बातम्या