Mangal Gochar In Aries: वैदिक ज्योतिष्य शास्त्रनुसार मंगळ ग्रह धाडस, निर्भयता, राग, संपत्तीचा कारक मानला जातो. त्यामुळे जेव्हा मंगळ ग्रहाची चाल बदलते तेव्हा त्याचा काही क्षेत्रांवर विशेष प्रभाव पडतो. मंगळ ग्रहाने ४५ दिवसांनी आपल्या मेष राशीमध्ये प्रवेश केला आहे ज्यामुळे काही राशीच्या लोकांचे भाग्य चमकणार आहे. तसेच करिअर आणि व्यवसायात या लोकांना विशेष यश मिळू शकते. चला जाणून घेऊ या लकी राशी कोणत्या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मीन

मीन राशीसाठी मंगळ ग्रहाचा मेष राशीमध्ये प्रवेश होणे लाभदायी ठरू शकते. कारण मंगळ ग्रह मीन राशीमध्ये धन घरावर परिणाम केला आहे.त्यामुळे या काळात मीन राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच मागील काही कालापासून जे काम अडकले आहे ते देखील पूर्ण होऊ शकते. व्यवसायामध्ये कित्येक नवीन ऑफर मिळल्याने प्रगती होईल. बीजनेसमध्ये कित्येक लोकांशी भेटी-गाठी होतील ज्यामुळे भविष्यात धनलाभ होऊ शकतो. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधार शकता. तसेच या काळात तुमच्या वाणीच्या प्रभाव वाढेल आणि ज्यामुळे लोक खुश होतील.

हेही वाचा – Rahu Mangal Yuti : राहु मंगळ युती संपली, ‘या’ तीन राशी होऊ शकतात करोडपती, मिळणार बक्कळ पैसा

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी मंगळाच्या राशीतील बदल शुभ ठरू शकतात. कारण मंगळाचे संक्रमण तुमच्या राशीतून कर्म घरावर परिणाम करत आहे. त्यामुळे या काळात नोकरी आणि व्यवसायात विशेष प्रगती होऊ शकते. जे लोक गेल्या काही दिवसांपासून नवीन नोकरीच्या शोधात व्यस्त होते, त्यांच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. तसेच या काळात व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो. तेथे व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. यावेळी तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. तसेच वडिलांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील.

हेही वाचा – पुढचे २ दिवस बक्कळ पैसा; चंद्र-गुरु निर्माण करणार ‘गजकेसरी राजयोग’, ‘या’ तीन राशी होणार मालामाल

धनु

मंगळाचे भ्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण मंगळ तुमच्या राशीतून पाचव्या घरातून जात आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तसेच, करिअरमधील तुमच्या कामामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. दुसरीकडे, जर तुमचे प्रेमसंबंध सुरु असतील तर तुम्हाला त्यात यश मिळू शकते. यावेळी तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. तसेच, या काळात तुम्ही कोणतीही मालमत्ता खरेदी करू शकता.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mangal gochar 0 4 mars transit in aries these zodiac sign get more profit snk 94