Mangal Gochar in Kanya Rashi : ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ ग्रह जवळपास प्रत्येक १८ महिन्यानंतर आपली राशी परिवर्तन करतात आणि हा बदल ग्रहांच्या प्रभावामध्ये महत्त्वाचे परिवर्तन आणतो. मंगळ ग्रह मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह मानला जातो, त्यामुळे याचे राशी परिवर्तन या राशींसह अन्य राशींवर खोलवर परिणाम करतात.
सध्या मंगळ सिंह राशीमध्ये विराजमान आहे आणि केतुसह युती निर्माण करत आहे. ज्यामुळे काही राशींमध्ये तणावाची स्थिती दिसून येईल पण २८ जुलै मंगळ कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे, जे काही लोकांसाठी नवीन ऊर्जा आणि सकारात्मक बदल घेऊन येईल. या राशी परिवर्तनामुळे काही राशींचे नशीब चमकू शकते आणि त्यांच्या जीवनात नवीन संधी आणि आनंदाचे आगमन होऊ शकते.
या दरम्यान या राशींना अचानक धन लाभ होऊ शकतो. त्यांची आर्थिक स्थिती मजबूत राहीन. देश विदेशात प्रवेश करण्याच्या संधी मिळू शकतात, ज्यामुळे त्यांची सामाजिक आणि व्यावसायिक स्थिती सुधारू शकते. त्या शिवाय अपत्याशी संबंधित कोणतीही शुभ वार्ता मिळू शकते, ज्यामुळे घरात सुख समृद्धी नांदेल. अडकलेले धन संपत्ती परत मिळू शकते ज्यामुळे आत्मविश्वास वाढणार. मंगळचा कन्या राशीमध्ये गोचर या राशींना विविध क्षेत्रात प्रगती आणि यशाचे नवे मार्ग मिळतील. जाणून घेऊ या त्या राशी कोणत्या आहेत?
सिंह राशी
सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळ गोचर लाभदायक ठरू शकतो कारण मंगळ या सिंह राशीच्या दुसर्या भावात प्रवेश करत आहे ज्यामुळे या लोकांच्या जीवनात आकस्मिक धन लाभ आणि नोकरीच्या नवीन संधीचे योग जुळून येईल. प्रयत्नाला यश येईल आणि नशीबाची साथ मिळेल. ध्येयाबाबत स्पष्टता मिळणार आणि आत्मविश्वासाने महत्त्वाचे निर्णय घेण्यात यशस्वी होईल. हा काळ नेतृत्व गुण दाखवण्यासाठी फायदेशीर ठरेन. तसेच हे लोक वाहन किंवा संपत्ती खरेदी करू शकतात. आईचे सहकार्य मिळेन.
वृश्चिक राशी
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मंगळ ग्रहाचे गोचर अत्यंत शुभ फळ देणारे ठरू शकतात. कारण मंगळ या राशीच्या कमाई आणि लाभ स्थानावर विराजमान आहे. त्यामुळे या लोकांच्या कमाईत वृद्धी होऊ शकते आणि कमाईचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात. नवीन काम सुरू करण्यासाठी किंवा मोठे ध्येय प्राप्त करण्यासाठी हा कालावधी उत्तम आहे. या लोकांची क्रिएटिव्हीटी वाढणार, ज्यामुळे कला इत्यादी क्षेत्रात यश मिळू शकते. अपत्याशी संबंधित शुभ वार्ता ऐकायला मिळेल.
मकर राशी
मकर राशीच्या लोकांसाठी मंगळ ग्रहाचे गोचर अत्यंत फायदेशीर राहीन. कारण हे गोचर या राशीच्या नवव्या भावात राहीन. या दरम्यान अडकलेले कार्य पूर्ण होऊ शकतात आणि व्यवसायात किंवा कामाच्या बाबतीत प्रवासाच्या संधी मिळू शकतात. या लोकांच्या घरी कोणतेही धार्मिक किंवा मांगलिक कार्यक्रम होऊ शकतात. समाजात या लोकांचा मान सन्मान वाढणार. अध्यात्मिकदृष्ट्या हे लोक त्यांच्या ध्येयाबाबतीत स्पष्ट राहतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना भरघोस यश मिळेन.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)