Mangal Shukra Yuti 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात, शुक्र हा भौतिक सुख, वैभव, ऐश्वर्य आणि संपत्तीचा तर मंगळ हा संपत्ती, क्रोध, रक्त, धैर्य, शौर्य आणि शौर्य यांचा कारक मानला जातो. तर आता या दोन्ही ग्रहांची युती नोव्हेंबरमध्ये होईल. तेव्हा मंगळ ग्रह स्वतःच्या ‘वृश्चिक राशीत’ प्रवेश करून मित्र शुक्र ग्रहाशी युती करणार आहे. त्यामुळे काही राशींसाठी चांगला काळ येऊ शकतो. याव्यतिरिक्त, संपत्तीत प्रचंड वाढ सुद्धा होईल. तर चला जाणून घेऊया की या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…
मीन – मंगळ आणि शुक्र यांची युती मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. कारण ही युती तुमच्या राशीच्या भाग्यस्थानात तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला भाग्याची साथ लाभेल. तुम्ही देशात किंवा परदेशात प्रवास देखील करू शकता. कुटुंबात आनंद आणि उत्साह वाढेल. घरी शुभ कार्यक्रम किंवा शुभ प्रसंग आयोजित केले जाऊ शकतात. प्रियजनांशी संबंध आणखीन गोड होतील. याव्यतिरिक्त, नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते.
कुंभ – मंगळ आणि शुक्र यांची युती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. ही युती तुमच्या राशीच्या उत्पन्न आणि नफा स्थानात तयार होत आहे. त्यामुळे, या काळात तुमचे उत्पन्न लक्षणीयरीत्या वाढू शकते. तुमची कमाई वाढेल, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. एका मोठ्या व्यवसाय करारामुळे नफा होईल तर कदाचित गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. नोकरदार व्यक्तींना यावेळी नवीन जबाबदाऱ्या आणि पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामगिरीचे कौतुक केले जाईल.
वृश्चिक – शुक्र आणि मंगळाची युती तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. ही युती तुमच्या राशीच्या लग्न स्थानात तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. तुमच्या जोडीदाराबरोबरचे तुमचे नाते आनंददायी राहील, जोडीदाराची प्रगती होईल. अविवाहित व्यक्तींना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. या काळात तुमची नियोजन आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढेल, ज्यामुळे तुम्ही सर्वात आव्हानात्मक परिस्थितीतही योग्य मार्ग निवडू शकाल. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होईल. दीर्घकाळापासून असलेले आर्थिक अडथळे आता दूर होतील. नवीन घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होईल.
