Mangal Transit 2025: मार्गशीर्ष शुक्ल पक्ष पंचमी ६ डिसेंबर २०२४ दिवशी शुक्रवारी मंगळ कर्क राशीमध्ये वक्री गतीने गोचर करण्यास सुरुवात केली आहे. २३ जानेवारी २०२५ पर्यंत वक्री गतीने प्रवेश करणार आहे. मिथुन राशीमध्ये मंगळ २४ फेब्रुवारी सोमवार पर्यंत वक्री गतीने प्रवेश करणार आहे आणि ७ एप्रिल पर्यंत विराजमान राहीन.
कर्क राशी मध्ये मंगळ गोचर
मंगळ कर्क राशीमध्ये ७ एप्रिल २०२५ सोमवारी रात्री ४ वाजून ३३ मिनिटांपासून ९ जून २०२५ पर्यंत विराजमान राहीन
सिंह राशीमध्ये मंगल गोचर
मंगळ ग्रह सिंह राशीमध्ये ९ जून २०२५ सोमवारी रात्री पासून ३१ जुलै गुरुवारपर्यंत विराजमान राहीन.
कन्या राशीमध्ये मंगळ गोचर
मंगळ ग्रह कन्या राशीमध्ये ३१ जुलै २०२५ गुरुवारी पहाटे सहा वाजून ९ मिनिटांपासून १५ सप्टेंबर २०२५ ला रात्री १० वाजून १० मिनिटांपर्यंत विराजमान राहीन
तुळ राशीमध्ये मंगळ गोचर
मंगळ तुळ राशीमध्ये १५ सप्टेंबर २०२५ सोमवार रात्री १० वाजून ०१ मिनिटांपासून २८ ऑक्टोबर मंगळवार सायंकाळी ४ वाजून २४ मिनिटांपर्यंत विराजमान राहीन
वृश्चिक राशीमध्ये मंगळ गोचर
वृश्चिक राशीमध्ये मंगळ २८ ऑक्टोबर मंगळवार सायंकाळी ४ वाजून २४ मिनिटांपासून ७ डिसेंबर रविवार २०२५ दुपारी २ वाजून ३७ मिनिटांपर्यंत विराजमान राहीन.
हेही वाचा : Shukra Gochar: २०२५ सुरु होताच ‘या’ राशींचे नशीब पालटणार? शुक्राच्या आशीर्वादाने होऊ शकतो प्रचंड धनलाभ
धनु राशीमध्ये मंगळ गोचर
७ डिसेंबर २०२५ रविवार दुपारी २ वाजून ३७ मिनिटांपासून १५ जानेवारी २०२६ गुरुवार दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत धनु राशीमध्ये मंगळ ग्रह विराजमान राहीन.
मंगळ गोचरचा प्रभाव
मंगळ ग्रह नवीन वर्ष २०२५ मध्ये अनेकदा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ गोचरचा प्रभाव काही राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे तर काही राशीच्या लोकांसाठी अशुभ ठरणार आहे. वर्ष २०२५ मध्ये मंगळ मेष व वृश्चिक राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकते. या दोन्ही राशीचे स्वामी ग्रह मंगळ आहे. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात आर्थिक वृद्धी, करिअरमध्ये प्रगती आणि आरोग्यामध्ये सुधारणा दिसेल. याशिवाय मंगळ कुंभ, मीन, वृषभ, तुळ, धनु, कन्या, मकर व सिंह, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुभ फळ प्रदान करणार आहे. मिथुन राशीच्या लोकांना सतर्क राहणे गरजेचे आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाची शत्रू राशी मिथुन आहे.
© IE Online Media Services (P) Ltd