Vinayaka Chaturthi And Margashirsha Guruvar Vishesh Rashi Bhavishya : ५ डिसेंबर २०२४ रोजी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. चतुर्थी तिथी दुपारी १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत राहील. आज दुपारी १२ वाजून २८ मिनिटांपर्यंत वृद्धी योग जुळून येईल. तसेच उत्तरषाढा नक्षत्रा आज संध्याकाळी ५ वाजून २७ मिनिटांपर्यंत राहील. राहू काळ १ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजेपर्यंत सुरु होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याशिवाय आज विनायक चतुर्थी असणार आहे. मार्गशीष महिन्याच्या विनायक चतुर्थीच्या दिवशी प्रथम पूज्य गणपती बाप्पाची पूजा केल्याने लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि घरात सुख-शांती राहते. चतुर्थी तिथी काल १ वाजून १० मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत संपेल. तसेच आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार सुद्धा असणार आहे. या दिवशी स्त्रिया देवीचा घट मांडून तिची पूजा अर्चना करतात. महालक्ष्मीचे व्रत वाचून नैवेद्य अर्पण करतात. तर आज गणपती बाप्पा आणि महालक्ष्मीच्या कृपेने कोणाचा दिवस शुभ जाणार, कोणाला अपार यश मिळणार तर कोणाच्या गोष्टी मनाप्रमाणे घडणार हे आपण जणूं घेऊया…

५ डिसेंबर पंचांग व राशिभविष्य (Aries To Pisces Horoscope Today) :

मेष:- तुमचा व्यवहार शालीन राहील. गोष्टी मनाप्रमाणे घडवून आणाल. न आवडणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. जोडीदाराला खुश कराल. आज तुमचा चांगला प्रभाव पडेल.

वृषभ:- अचानक खर्च समोर येऊ शकतात. मानसिक व्यग्रता टाळावी. आपल्या मतावर ठाम राहावे. आज उधारी घेणे टाळावे. आध्यात्मिक बाबतीत प्रगती कराल.

मिथुन:- आज चांगला धनलाभ होईल. गोष्टी मनाप्रमाणे घडून येतील. केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल. भावंडांसोबतच्या नात्यात सुधारणा होईल. जवळचे मित्र भेटतील.

कर्क:- कामाच्या ठिकाणी प्रगती कराल. कामाचा उरक वाढवावा. सहकार्‍याला मदत कराल. घरातील कामासाठी वेळ काढावा लागेल. मन प्रसन्न राहील.

सिंह:- बिघडलेल्या गोष्टी संतुलित करता येतील. आज मनात करुणा निर्माण होईल. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. इतरांच्या आनंदाने खुश व्हाल.

कन्या:- आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका. बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नका. हलका आहार घ्यावा. व्यायामाला कंटाळू नका. काही अनपेक्षित गोष्टी घडून येतील.

तूळ:- जोडीदारासमवेत वेळ माझे घालवाल. लहान व्यवसायिकांना चांगला नफा कमावता येईल. तुमच्या ओळखीत वाढ होईल. सर्वांशी आपुलकीने वागाल. कौटुंबिक जीवनात समाधान मिळेल.

वृश्चिक:- छुपे शत्रू माघार घेतील. कोणाकडूनही फार अपेक्षा ठेऊ नका. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. आपल्या कामात स्वत:ला गुंतवून घ्याल. हाताखालील लोकांवर विसंबून राहू नका.

धनू:- कौटुंबिक जीवनात सुखद अनुभव येतील. आजचा दिवस खेळीमेळीने घालवाल. मुलांसोबत वेळ मजेत जाईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.

मकर:- आज अधिक वेळ घरात काढाल. स्वत:ला कामात गुंतवून घ्याल. मनातील निराशा दूर सारावी. वाहन विषयक कामे पार पडतील. मनातील विचार घरातील लोकांसमोर मांडाल.

कुंभ:- आज घाई गडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. प्रवासात काळजी घ्यावी. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. लहान भावंडे आपल्याला मदत करतील. चौकसपणे सर्व गोष्टींकडे पहावे.

मीन:- कुटुंबातील व्यक्तींबाबत अतिशय दक्ष राहाल. सर्वांची आपुलकीने काळजी घ्याल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. खाण्यापिण्याची हौस भागवाल. मनातील भावना व्यक्त कराल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Margashirsha guruvar vishesh rashi bhavishya which zodiac signs will get money good opportunity and love asp