Shatruhanta Yoga In Kanya Rashi: ज्योतिषशास्त्रात १२ राशी, ९ ग्रह आणि २७ नक्षत्रांना महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये प्रत्येक ग्रहाचे स्वतःचे महत्त्व आहे. प्रत्येक ग्रहाच्या गोचरचा सर्व राशीच्या लोकांवर चांगला आणि वाईट प्रभाव पडत असतो. आता कन्या राशीत मंगळ ग्रहाने प्रवेश केला आहे. त्यामुळे या राशीमध्ये ‘शत्रुहंता योग’ तयार झाला आहे. हा योग १८ सप्टेंबर पर्यंत असेल. या योगाचा काही राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या राशी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या’ तीन राशींना आर्थिक लाभाचे योग?

मेष राशी

शत्रुहंता योग बनल्याने या राशींच्या लोकांच्या जीवनात चांगल्या गोष्टी घडण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. जुनी गुंतवणूक केली असेल तर त्यातून नफा मिळू शकतो. खटले आणि शत्रूंवर विजय मिळवण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होऊ शकतात. तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ मिळू शकतो.

(हे ही वाचा : सप्टेंबर महिन्यात ‘या’ चार राशींचे भाग्य पालटणार? शुक्रदेव अन् बुधदेवाच्या संयोगाने ३० दिवस घरात येऊ शकतो पैसा )

कर्क राशी

शत्रुहंता योग तयार झाल्याने या राशीतील लोकांचे भाग्य चमकण्याची शक्यता आहे. ठरलेल्या योजनांमध्ये अपेक्षित यश मिळू शकते. तसेच या काळात केलेली गुंतवणूक फलदायी ठरू शकते. सरकारी नोकरीसाठी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश या काळात मिळू शकते. व्यवसायात नवीन संधी चालून येऊ शकतात. आर्थिक लाभ होऊ शकतो.

तूळ राशी

शत्रुहंता योगामुळे या राशीतील लोकांना भौतिक सुखाचा पूर्ण लाभ मिळू शकतो. तुमचे उत्पन्नही वाढू शकते, तुमच्या नोकरीत बदल होऊ शकतो. कौटुंबिक जीवनातही प्रगती होऊ शकते. सर्व कामांमध्ये जोडीदाराचे सहकार्य मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी सन्मान मिळू शकतो. या काळात व्यवसायात नफा, नोकरीत बढती आणि वडिलोपार्जित मालमत्तेचा लाभ होण्याची दाट शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mars transit in vigro make shatruhanta yoga these three zodic signs bank balance to raise money marathi astrology pdb