Mars Retrograde Transit Gemini: ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन करतो. अनेकदा याचा फायदा काही राशींच्या व्यक्तींना होतो, तर अनेकदा मंगळाचा अशुभ प्रभावही अनेक राशींवर पाहायला मिळतो. दरम्यान, मंगळ ग्रह २१ जानेवारी रोजी कर्क राशीतून उलट्या चालीने मिथुन राशीत प्रवेश करेल. ज्याच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या’ तीन राशींच्या आयुष्यात निर्माण होणार अडचणी

वृषभ

ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाची वक्री चाल अनेक अडचणी निर्माण करणार असेल. या काळात प्रवासात अडचणी येऊ शकतात. तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि नात्यात गैरसमज वाढू शकतात. नोकरीत बदलीचे संकेत आहेत. व्यवसायात तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळणार नाही. आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठीही मंगळाची वक्री चाल अनुकूल सिद्ध होणार नाही. या काळात नोकरीत बदलाचे संकेत आहेत. नशीब तुमच्या बाजूने कमी असल्याने व्यवसायातही नुकसान होऊ शकते. मानसिक तणाव वाढू शकतो आणि प्रवासात काळजी घ्या. पाय आणि सांधे दुखीची समस्या वाढू शकते. धनहानी होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोणतेही मोठे व्यवहार करताना काळजी घ्या.

मीन

मंगळाची वक्री चाल मीन राशीसाठी अत्यंत चिंताजनक ठरेल. वैवाहिक जीवनात अनेक अडचणी निर्माण होतील. नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. व्यवसायातील भागीदारी तुटू शकते आणि खर्च वाढू शकतो. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. आरोग्याबाबत काळजी घ्या, ॲलर्जी किंवा त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.

(टीप- वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mars vakri 25 negative effect after 3 days these three zodic sign will have to face difficulties sap