Daily Rashi Bhavishya : २९ जानेवारी २०२५ रोजी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची अमावस्या तिथी आहे. अमावस्या तिथी संध्याकाळी ६ वाजून ०६ मिनिटांपर्यंत राहील. आज रात्री ९ वाजून २२ मिनिटांपर्यंत सिद्धी योग जुळून येईल. तसेच उत्तराषाढा नक्षत्रा आज सकाळी ८ वाजून २१ मिनिटांपर्यंत जागृत असेल, त्यानंतर श्रवण नक्षत्र दिसेल. तर आज राहू काळ दुपारी १२ वाजता सुरु होईल ते १ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्याचप्रमाणे आज दर्श अमावस्या असणार आहे. पौष महिन्यात येणारी अमावस्या दर्श अमावस्या म्हणून ओळखली जाते. या अमावस्येला मौनी अमावस्या देखील म्हणातात. यावर्षी प्रयागराजमध्ये महाकुंभ महोत्सव सुरू आहे आणि अशा परिस्थितीत मौनी अमावस्येच्या दिवशी दुसरे अमृत स्नान देखील तेथे केले जाणार आहे. मौनी अमावस्येला त्रिवेणी योगाचा अप्रतिम संगम घडणार आहे. या दिवशी सूर्य, चंद्र आणि बुध मिळून मकर राशीत त्रिग्रही आणि त्रिवेणी योग तयार करणार आहेत. याशिवाय गुरू देखील वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. तर आज ग्रहांचा राशीबदल आणि मौनी अमावस्या कोणत्या राशीच्या नशिबाला कलाटणी देणार हे आपण जाणून घेऊया…

२९ जानेवारी पंचांग व राशिभविष्य (Mesh To Meen Horoscope) :

मेष:- ताणतणाव बाजूला सारावेत. घरातील गोष्टीत अधिक लक्ष घाला. नवीन मित्र जोडाल. कामात स्त्रियांची मदत घ्याल. मौल्यवान वस्तू खरेदी कराल.

वृषभ:- कामातील घाई उपयोगाची नाही. वैचारिक स्थिरता ठेवावी. प्रवासात काळजी घ्यावी. संयम बाळगावा लागेल. प्रलोभनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.

मिथुन:- कौटुंबिक विचाराला प्राधान्य द्यावे. अपचनाचा त्रास जाणवेल. जोडीदाराचे वर्चस्व राहील. शांतपणे विचार मांडावेत. भौतिक गोष्टींचा फार विचार करू नका.

कर्क:- भावनेला आवर घालावी लागेल. मुलांचा व्रात्यपणा वाढेल. मैदानी खेळ खेळाल. अंगातील जोम वाढेल. काही कामे विनासायास पार पडतील.

सिंह:- बौद्धिक दृष्टीने विचार करावा. गूढ गोष्टी जाणून घेण्यात रस दाखवाल. लेखनाला चांगला उठाव मिळेल. लबाड लोकांपासून दूर राहावे. शैक्षणिक कामे पार पडतील.

कन्या:- तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल. गप्पांची आवड पूर्ण कराल. संभाषण कौशल्य दाखवता येईल. मित्रांचा गोतावळा जमवाल. नातेवाईकांची गाठ पडेल.

तूळ:- चौकसपणे गोष्टी जाणून घ्याल. ज्ञानात भर पडेल. सतत काहिनाकाही विचार करत राहाल. योग्य परीक्षण करावे लागेल. उत्तम लिखाण करता येईल.

वृश्चिक:- बौद्धिक दृष्टीने विचार मांडाल. सर्वांशी लाघवीपणे बोलाल. चिकाटी सोडू नका. जुनी कामे डोकेवर काढतील.

धनु:- सर्वबाबी जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. हजरजबाबीपणा दाखवाल. गोड बोलून कामे पूर्ण करून घ्याल. अति चिकित्सा करू नका. कामात तत्परता दाखवावी.

मकर:- अघळपघळ बोलू नये. धार्मिक गोष्टीत लक्ष घालाल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. आपल्याच मतावर आग्रही राहू नका. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील.

कुंभ:- गप्पीष्ट लोकांमध्ये वावराल. लहनांशी मैत्री कराल. मित्रांच्या ओळखीचा लाभ होईल. मोठ्या लोकांमध्ये उठबस वाढेल. दिवस मानाजोगा जाईल.

मीन:- बौद्धिक चातुर्य दाखवाल. कल्पकतेने विचार कराल. पुढील परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा. व्यवहार चातुर्य दाखवाल. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mauni amavasya 2025 on 29 january how will wednesday go for your mesh to meen zodiac sign read horoscope in marathi asp