Premium

२७ डिसेंबरला बुध उदयासह ‘या’ राशींचा होणार भाग्योदय; २०२४ मध्ये प्रचंड पैसे व आनंदाने भरून जाईल ओंजळ

Budh Uday 2023: २०२३ च्या शेवटापासून बुध प्रभावाने तीन राशींच्या नशिबातील अडथळे दूर होणार आहेत, परिणामी २०२४ च्या सुरुवातीला सुद्धा या राशींच्या कुंडलीत अनेक..

Mercury Budh Graha Uday on 27th December Will Make Major Kundali Change For Three Rashi 2024 lucky zodiac Bhavishya Money
बुध उदय 'या' राशींसाठी असणार नशीब पालटण्याची संधी (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Mercury Rising in Scorpio 2023: ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबर महिन्यात तब्बल पाच ग्रहांचे गोचर होणार आहे. त्यात डिसेंबरच्या शेवटाकडे बुद्धी, धन, व्यापार व वाणीचा कारक बुध देव २७ डिसेंबर २०२३ उदयस्थितीत येणार आहे. २०२३ च्या शेवटी होणारा बुध उदय काही राशींसाठी अत्यंत लाभदायक असणार आहे. बुध ग्रह सध्या वृश्चिक राशीत उदित होणार आहे. २०२३ च्या शेवटापासून बुध प्रभावाने तीन राशींच्या नशिबातील अडथळे दूर होणार आहेत, परिणामी २०२४ च्या सुरुवातीला सुद्धा या राशींच्या कुंडलीत अनेक सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. या राशींच्या व्यक्तींना अचानक व अनपेक्षित रूपात धनलाभ होऊ शकतो. बुध उदय कोणत्या राशीसाठी फायदेशीर असणार हे पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुध उदय ‘या’ राशींसाठी असणार नशीब पालटण्याची संधी

सिंह रास (Leo Rashi Bhavishya)

सिंह राशीच्या व्यक्तींना बुध उदय अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो. २०२४ च्य सुरुवातीपासूच या मंडळींना व्यवसायात व नोकरीत यश हाती लागू शकते. आयुष्यात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी शुभ योग आहे. आई- वडिलांच्या आरोग्याबाबत चिंता दूर होईल. तुमच्या आयुष्यात बदल होण्याचे संकेत आहेत ज्याचा प्रभाव तुमच्या संपूर्ण जीवनशैलीवर दिसून येऊ शकतो. आईची साथ खूप महत्त्वाची ठरू शकते. वाडवडिलांच्या जुन्या संपत्तीचा लाभ आता मिळू शकतो. आरोग्याची काळजी घ्या.

कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)

कर्क राशीसाठी बुध ग्रहाचा उदय आनंदाची सुरुवात असू शकते. तुमच्या रूपात इतरांना फायदा होण्याची शक्यता अधिक आहे. विशेषतः तुमच्या कुटुंबियांसाठी तुम्ही भाग्योदयाचे माध्यम ठरू शकता. संतती सुख आपल्या नशिबात दिसत आहे. विद्यार्थी वर्गाला या कालावधीत एकाग्रता गवसेल यामुळे अनेक कठीण गोष्टी सहज होतील. साहस व पराक्रम गाजवण्याची संधी मिळू शकते. वाणीच्या बळावर तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुमच्या बोलण्यामुळे लक्ष्मीचा आशीर्वाद लाभू शकतो.

हे ही वाचा << ३१ डिसेंबरआधी लक्ष्मीकृपेने मेष ते मीनपैकी तुमच्या राशीला होणार का धनलाभ? अपार श्रीमंतीसह आरोग्य साथ देईल का?

तूळ रास (Libra Rashi Bhavishya)

तूळ राशीसाठी बुध उदय फायदेशीर ठरू शकतो. आपल्या बोलण्याकडे व कामाकडे लोक आकर्षित होतील. बुध उदयासह झालेला राहुचा राशीबदल आपल्यासाठी अनेक दृष्टीने हितावह ठरेल. हिंमत वाढेल. स्पर्धा परीक्षेच्या तयारीला साहाय्य मिळेल. बढती, बदलीचे प्रयत्न सुरू करा. जोडीदाराच्या प्रगतीचा आलेख उंचावेल. कामासाठी लहानमोठे प्रवास कराल. कुटुंबासंमवेत वेळ घालवाल. आपल्या राशीतील शुक्र छंद, आवडीनिवडी यांना पूरक ठरेल. छंदाचे रूपांतर लहानश्या व्यवसायातही करू शकाल. कामाचे आयोजन चोख असायला हवे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mercury budh graha uday on 27th december will make major kundali change for three rashi 2024 lucky zodiac bhavishya money svs

First published on: 06-12-2023 at 10:54 IST
Next Story
Daily Horoscope: ‘या’ राशीच्या व्यक्तींना कामाच्या नवीन संधी उपलब्ध होणार, जाणून घ्या तुमचे भविष्य