December 2023 Monthly Horoscope In Marathi: २०२३ मधील शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर सुरु होताना अनेक ग्रहांचे राशी व नक्षत्र परिवर्तन करणार आहे. सूर्य, शुक्र, गुरू, बुध आणि मंगळ आपल्या चालीत बदल करणार आहेत. या पाच ग्रहांच्या परिवर्तनामुळे काही राशींच्या नशिबाला पूर्णपणे कलाटणी मिळू शकते. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या राहू गोचराचा प्रभाव सुद्धा काही राशींच्या कुंडलीतील घडामोडींना वेग देणार आहे. याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव ३१ डिसेंबर पर्यंतच मर्यादित नसून येत्या नववर्षात सुद्धा यामुळे परिणाम दिसून येऊ शकतात. ज्योतिषतज्ज्ञ सोनल चितळे यांच्या मार्गदर्शनानुसार आपण डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलच आपण मेष ते मीन अशा सर्व राशींचे भविष्य वेध घेणार आहोत. तुमच्या कुंडलीत २०२३ च्या शेवटच्या महिन्यात लक्ष्मी विराजमान असणार का? आरोग्यासाठी काय काळजी घ्यावी लागू शकते या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया..

डिसेंबर २०२३ साठी मेष ते मीन या १२ राशींचे भविष्य

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

विवाहीत दाम्पत्यांना वैवाहिक सौख्य चांगले मिळेल. एकमेकांना समजून घ्याल. दोघांनी एकमेकांचे स्वातंत्र्य जपावे. जी अपेक्षा दुसऱ्याकडून करतो तीच आणि तशी अपेक्षा दुसरा देखील आपल्याकडून करत असेल असा विचार करावा. आपल्या राशीतील गुरू हर्षल अविचाराने पाऊल पुढे टाकण्यास भर घालतील परंतु शनीच्या योगामुळे संयम बाळगू शकाल. संतानप्राप्तीसाठीचे प्रयत्न यशस्वी ठरतील. वैद्यकीय उपचार वा सल्ला लाभदायक ठरेल. मुलांकडून आनंदवार्ता समजतील.

rahu shukra yuti 2025 in marathi astrology
Rahu Shukra Yuti 2025: २०२५ वर्ष ‘या’ तीन राशींसाठी सुखाचं! राहू-शुक्राच्या संयोगाने मिळणार प्रचंड पैसा, आनंद अन् मान सन्मान
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
kharmas 2024 horoscope surya gochar 2024 in marathi
Kharmas 2024: १५ डिसेंबरपासून ‘या’ चार राशींवर मिळेल बक्कळ पैसा! खरमास सुरू होताच सूर्यदेवाच्या आशीर्वादाने धनलाभाची संधी
8 December Aries To Pisces Horoscope Today
८ डिसेंबर पंचांग: कोणाला होईल अचानक धनलाभ ते कोणाचा वाढेल ताण; जन्मराशीनुसार आजचा रविवार १२ राशींसाठी कसा असणार?
7 December astrological predictions for zodiac signs
७ डिसेंबर पंचांग: धनिष्ठा नक्षत्रात १२ राशींवर होणार सुखाचा वर्षाव; पद, पैसा, प्रतिष्ठेत होईल वाढ, तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय खास?
Kark Rashifal 2025
Kark Rashifal 2025: कर्क राशीसाठी कसे असेल नववर्ष २०२५? कोणत्या ग्रहाचे गोचर ठरणार लाभदायी, कोणाची होईल कृपा?
mithun
Mithun Rashifal 2025: नववर्षात मिथुन राशीच्या लोकांचे नशीब चमकणार! शनीदेवाची होणार कृपा
Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : शनिच्या राशीमध्ये शुक्र करणार गोचर, ‘या’ राशीच्या लोकांच्या आनंदाला लागणार ग्रहण

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

राहूचे आपल्या व्यवस्थानातून लाभ स्थानातील मीन राशीत भ्रमण झाले आहे. आपला खरेपणा सर्वांना मान्य करावा लागेल. सप्तमतील रवी, मंगळ जोडीदाराला प्रगतिकरक ठरेल. संततीप्राप्तीसाठी थोडे सबुरीने घ्यावे लागेल. औषधांचा भडीमार सोसायचा नाही. नोकरी व्यवसायातील मेहनतीचे फळ मिळण्यास उशीर होईल पण सातत्य सोडू नका. विद्यार्थ्यांनी फक्त चंगळ वादाकडे लक्ष न देता अभ्यासाचे नियोजन आणि या नियोजनाचे अवलंबन करणे गरजेचे आहे. जोखीम पत्करताना आपल्या क्षमतेचा विचार जरूर करावा.

मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)

२८ नोव्हेंबरला आपल्या दशम स्थानात राहू प्रवेश करणार आहे. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने हा योग चांगला असेल. हिंमत आणि धडाडीने आपली कर्तव्ये पार पाडाल. पंचमातील स्वगृहीचा शुक्र प्रेमप्रकरणात यश देईल. तसेच सहवासातून प्रेम उत्पन्न होईल. बौद्धिक आणि कला क्षेत्रात प्रगती कराल. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे अवघड जाईल. मजा मस्तीवर मर्यादा ठेवाव्याच लागतील. विवाहितांना एकमेकांच्या सहवासात आनंद मिळेल. कफ आणि पित्ताचा त्रास जाणवेल. जागरणे टाळा. आर्थिक दृष्टया स्थैर्य लाभेल.

कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)

२८ नोव्हेंबरला राहूचा आपल्या भाग्य स्थानातील मीन राशीत प्रवेश होणार आहे. धैर्य मिळेल. अनेक अनाकलनीय गोष्टींची उकल होईल. आर्थिक बाजू भक्कम होईल. नुकसानभरपाई मिळेल. कौटुंबिक वाद शांत होईल. नोकरीच्या ठिकाणी कामाची दखल घेतली जाईल. जोडीदार त्याच्या कामकाजात अधिक व्यस्त असेल. एकमेकांची अडचण समजून घेण्यातच शहाणपणा आहे. विद्यार्थी वर्गाने अभ्यासावरील पकड सैल करू नये. वेळ कधी कोणासाठी थांबत नाही. अपचनाचा त्रास वाढेल.

सिंह रास (Leo Rashi Bhavishya)

२८ नोव्हेंबरला भाग्य स्थानातील राहू आता अष्टमातील मीन राशीत प्रवेश करणार आहे*. कामात अडचणी , अडथळे आले तरी गुरू, मंगळ आणि शुक्र यांची भ्रमणे साहाय्यकारी असतील. त्यामुळे प्रश्न सुटतील. मार्ग मोकळा होईल. डोक्याला ताप करून घेऊ नका. समस्येतून संधी शोधा. प्रवासयोग चांगला आहे. लाभकारक घटना घडतील. विद्यार्थी वर्गाने अभ्यासावरून लक्ष विचलित होऊ देऊ नका. नोकरीत बढती , बदलीसाठी प्रयत्न सुरू करावेत. व्यावसायिकांची व्यवसाय वाढवण्याची स्वप्ने पूर्ण होतील.

कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)

२८ नोव्हेंबरला राहूने अष्टमातून सप्तम स्थानातील मीन राशीत प्रवेश केला असेल. नवे करार डोळसपणे करावेत. परिणामांचा विचारविनिमय आधीच कराल. विद्यार्थी वर्गाने जिद्दीने आगेकूच करावी. गुंतवणूकदारांना उत्तम परतावा मिळण्याचे योग आहेत. नोकरीत वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. व्यवसायात नव्या संकल्पना संबंधित व्यक्तींपुढे मांडाल. जोडीदाराच्या उत्कर्षाने समाधान वाटेल. मंगळाची साथ चांगली मिळेल. ध्येय निश्चित कराल. त्वचेसंबंधित त्रास वाढल्यास वैद्यकीय उपचार घ्यावे लागतील.

तूळ रास (Libra Rashi Bhavishya)

२८ नोव्हेंबरला झालेला राहुचा राशीबदल आपल्यासाठी अनेक दृष्टीने हितावह ठरेल. हिंमत वाढेल. स्पर्धा परीक्षेच्या तयारीला साहाय्य मिळेल. बढती, बदलीचे प्रयत्न सुरू करा. जोडीदाराच्या प्रगतीचा आलेख उंचावेल. कामासाठी लहानमोठे प्रवास कराल. कुटुंबासंमवेत वेळ घालवाल. आपल्या राशीतील शुक्र छंद, आवडीनिवडी यांना पूरक ठरेल. छंदाचे रूपांतर लहानश्या व्यवसायातही करू शकाल. कामाचे आयोजन चोख असायला हवे. सर्दी, खोकला, ताप यांच्या साथीला बळी पडाल.

वृश्चिक रास (Scorpio Rashi Bhavishya)

२८ नोव्हेंबरला राहुचा आपल्या पंचमातील मीन राशीत प्रवेश होणार आहे. इतर ग्रहांचे बळ चांगले असल्याने प्रगतीपथावर वाटचाल कराल. यशामुळे आत्मविश्वास वाढेल. स्थावर मालमत्तेबाबत सूत्रे हलतील. तज्ज्ञ मंडळींकडून योग्य मार्गदर्शन मिळेल. विद्यार्थीवर्गाकडून अपेक्षा उंचावतील. ताण घेऊ नका. जोडीदारासह शाब्दिक खटके वाजले तरी त्यात कटुता नसेल. प्रेमसंबंध अबाधित राहतील. नोकरी व्यवसायातील स्थिती सुधारेल. धनलाभ होईल. गुंतवणूक लाभदायक ठरेल. थंडीताप, साथीच्या विकारांपासून त्रास होईल.

धनु रास (Sagittarius Rashi Bhavishya)

ग्रहबल खूप चांगले असल्याने हाती घेतलेली कामे चोखपणे पूर्ण कराल. लाभतील शुक्र मोठे लाभ करून देईल. प्रयत्नांत कसूर करू नका. कुंभेतील शनी जिद्द आणि चिकाटी देईल. विद्यार्थी वर्गाला अभ्यासात , तंत्रज्ञानात उत्तम यश मिळेल. जोडीदाराच्या अडीअडचणी दूर कराल. अहं भाव बाजूला ठेवा. नोकरी व्यवसायात उत्तम प्रगती होईल. यशाचे झेंडे फडकवाल. ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तींचा सल्ला लाभदायक ठरेल. कामाच्या धावपळीत आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)

२८ नोव्हेंबरच्या राहूच्या राशी प्रवेशामुळे गुरूचे फळ चांगले मिळेल. आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. शिक्षणाचा उपयोग कामाच्या ठिकाणी झाल्याने अनुभवाची शिदोरी बळकट होईल. विद्यार्थी वर्गाच्या मेहनतीचे चीज होण्यास विलंब होईल. मन डगमगेल पण धीर सोडू नका. जोडीदारासह क्षुल्लक गोष्टींवरून वाद झाला तरी नात्यात कटुता येणार नाही. एकमेकांना समजून घेणे महत्वाचे ! आर्थिक लाभ होण्यासाठी ग्रहबल चांगले आहे. शुक्र शनीचा योग यशकारक ठरेल.

कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)

२८ नोव्हेंबरला राहूचा आपल्या द्वितीय स्थानातील मीन राशीत प्रवेश झाला आहे. वाणीला चांगली धार येईल. पण अशा वेळी शब्द जपून वापरावेत. नोकरी व्यवसायात गुरुबल चांगले असल्याने देशी विदेशी प्रवास घडतील. परदेशासंबंधीत कामांना वेग येईल. विद्यार्थी वर्गाच्या कष्टाचे चीज होईल. आजूबाजूला असलेली आकर्षणे आपल्यावर प्रभाव टाकू पाहतील. वेळीच स्वत:ला सावरा. जोडीदार आपल्या कामकाजात जातीने लक्ष घालेल. भरपूर धनलाभ होईल.

हे ही वाचा<< शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ राशी होणार करोडपती? २०२३ संपण्याआधी तुम्हाला कसा होईल धनलाभ?

मीन रास (Pisces Rashi Bhavishya)

२८ नोव्हेंबरला द्वितीयातील राहू मीन राशीत प्रवेश करेल; धीर वाढेल, आत्मविश्वास बळावेल. आजवर ज्या गोष्टी बोलून व्यक्त केल्या नसतील, अशा भावना योग्य शब्दात व्यक्त करण्याचे धाडस कराल. भाग्यातील रवी मंगळाचा देखील उत्तम परिणाम दिसून येईल. नोकरीत आपल्या चांगुलपणाचा इतरांना गैरफायदा घेऊ देऊ नका. व्यवसायात नवीन करार फलदायी ठरतील. विद्यार्थी वर्गाने कसून मेहनत घ्यावी, बेसावध राहू नका. जोडीदाराच्या सल्ल्याचा लाभ होईल. आरोग्य चांगले राहील.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader