Bhadra Rajyoga: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन पाहायला मिळते. ५ ऑगस्टपासून ग्रहांचा राजकुमार बुध सिंह राशीत वक्री झाला असून २९ ऑगस्टपर्यंत तो याच अवस्थेत राहील. पंचांगानुसार, सप्टेंबरमध्ये बुध ग्रह त्याची स्वराशी असलेल्या कन्या राशीत प्रवेश करील; ज्यामुळे भद्र महापुरुष राजयोग निर्माण होईल. त्यामुळे काही राशींच्या व्यक्तींची नोकरी, व्यवसायात प्रगती होईल.
कन्या राशीतील परिवर्तन तीन राशींसाठी खास
सिंह
भद्र राजयोग सिंह राशीच्या व्यक्तींसाठी खूप भाग्यकारक ठरेल. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. नोकरीत प्रगती आणि व्यवसायात वाढ होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. समाजात मान-सन्मान, यश-कीर्ती वाढेल. केलेल्या प्रत्येक कामात यश मिळवाल. भौतिक सुख-सुविधा प्राप्त कराल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. कुटुंबीयांची साथ मिळेल. नात्यातील गैरसमज दूर होण्यास मदत होईल. समाजात तुमच्या कामाचे कौतुक होईल, कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असेल.
कन्या
हा राजयोग कन्या राशीतच निर्माण होणार असून, या काळात तुम्ही आनंदी आणि सकारात्मक असाल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. नव्या वस्तू खरेदी कराल. समाजात पद-प्रतिष्ठा वाढेल. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. कर्ज कमी होण्यास मदत होईल. या काळात तीर्थक्षेत्रांना भेटी द्याल. कामातील अडथळे दूर होतील. मुलांकडून आनंदी वार्ता मिळतील, अडकलेला पैसा परत मिळतील. नोकरीमध्ये पदोन्नत्तीसह बदली होण्याची दाट शक्यता आहे. मालमत्तेसंबंधीचे वाद मिटतील. तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात प्रगती होईल.
हेही वाचा: २०२४ च्या शेवटपर्यंत मंगळ देणार दुप्पट पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींवर असेल देवी लक्ष्मीची कृपा
धनू
धनू राशीच्या व्यक्तींनादेखील बुध ग्रहाचे कन्या राशीतील परिवर्तन खूप शुभकारी ठरेल. या काळात तुम्ही खूप सकारात्मक असाल. आयुष्यात अनेक चमत्कारी बदल पाहायला मिळतील. आयुष्यात आनंदाचे अनेक क्षण येतील. करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होण्यास मदत होईल. बोलण्यात गोडवा येईल आणि त्यामुळे लोक तुमच्यावर प्रसन्न असतील. स्पर्धा परीक्षेत यश मिळवाल. या काळात धनू राशीच्या व्यक्तींसाठी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. प्रत्येक कामात पुढाकार घ्याल आणि जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
© IE Online Media Services (P) Ltd