November Festival List 2025 : नोव्हेंबर महिन्यात अनेक महत्त्वाचे व्रत आणि सण आहेत. या महिन्याची सुरुवातच ‘देवउठनी एकादशी’ने होते आहे. चार महिन्यांपासून योगिनीद्रामध्ये असलेले भगवान विष्णू १ नोव्हेंबर रोजी जागे होतील. हिंदू धर्मात देवउठनी एकादशीचे विशेष महत्त्व आहे. हा दिवस तुळशी विवाह म्हणूनही साजरा केला जातो. देवउठनी एकादशीच्या दिवसापासून लग्न आणि इतर शुभकार्यांना सुरुवात होते. यामुळे चातुर्मासामुळे शुभ कार्यक्रमांवर असलेल्या चार महिन्यांच्या पूर्णविरामाचा शेवट होईल. त्यामुळे संपूर्ण नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या सुरवातीच्या काही दिवसांत विवाहसोहळे होतील.

नोव्हेंबरमधील व्रत आणि सणांची यादी पुढीलप्रमाणे…

  • १ नोव्हेंबर २०२५ (शनिवार) – प्रबोधिनी एकादशी (देवउठणी एकादशी)
  • २ नोव्हेंबर २०२५ (रविवार) – तुळशी विवाह
  • ३ नोव्हेंबर २०२५ (सोमवार) – सोम प्रदोष व्रत
  • ५ नोव्हेंबर २०२५ (बुधवार) – कार्तिक पौर्णिमा, देव दिवाळी
  • ७ नोव्हेंबर २०२५ (शुक्रवार) – रोहिणी व्रत
  • ८ नोव्हेंबर २०२५ (शनिवार) – संकष्टी चतुर्थी
  • १२ नोव्हेंबर २०२५ (रविवार) – काल भैरव जयंती
  • १५ नोव्हेंबर २०२५ (सोमवार) – उत्पत्ती एकादशी
  • १६ नोव्हेंबर २०२५ (रविवार) – वृश्चिक संक्रांती
  • १७ नोव्हेंबर २०२५ (सोमवार) – सोम प्रदोष व्रत
  • १८ नोव्हेंबर २०२५ (मंगळवार) – मासिक शिवरात्री
  • २० नोव्हेंबर २०२५ (गुरुवार) – अमावस्या
  • २१ नोव्हेंबर २०२५ (शुक्रवार) – चंद्र दर्शन
  • २५ नोव्हेंबर २०२५ (मंगळवार) – विवाह पंचमी
  • २८ नोव्हेंबर २०२५ (शुक्रवार) – दुर्गाष्टमी व्रत

नोव्हेंबर मधील लग्नाचे मुहूर्त

  • २ नोव्हेंबर (रविवार)
  • ३ नोव्हेंबर (सोमवार)
  • ६ नोव्हेंबर (गुरुवार)
  • ८ नोव्हेंबर (शनिवार)
  • १२ नोव्हेंबर (बुधवार)
  • १३ नोव्हेंबर (गुरुवार)
  • १६ नोव्हेंबर (रविवार)
  • १७ नोव्हेंबर (सोमवार)
  • १८ नोव्हेंबर (मंगळवार)

देवउठणी एकादशीला संपणार चातुर्मास

देवउठणी एकादशी ही कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी एकादशी आहे. चातुर्मास याच दिवशी संपतो आहे. या वर्षी देवउठणी एकादशी १ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजून ११ मिनिटांनी सुरू होईल आणि २ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजून ३१ मिनिटांपर्यंत संपेल. १ नोव्हेंबर रोजी दिवसभर एकादशी साजरी केली जाणार असल्याने, त्या दिवशी देवउठणी एकादशी पाळणे योग्य ठरणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, २ नोव्हेंबर रोजी एकादशीचे व्रत सोडले जातील.