Numerology Predictions: सनातन धर्मात लक्ष्मीला धन, सुख-समृद्धी आणि ऐश्वर्याची देवी मानले जाते. असे मानले जाते की ज्या लोकांवर लक्ष्मी देवीची कृपा असते, त्यांचे जीवन आनंदाने भरलेले असते. म्हणूनच प्रत्येक जण देवी लक्ष्मीला प्रसन्न करून त्यांची कृपा मिळवू इच्छितो. पण लक्ष्मीची कृपा प्रत्येकावर होत नाही.
अंकज्योतिष शास्त्रानुसार, काही विशेष अंक असतात ज्यांच्याशी संबंधित लोकांवर देवी लक्ष्मी नेहमी कृपा करत असते. काही खास तारखांना जन्मलेल्या लोकांवर लक्ष्मीमातेची कृपा कायम राहते. जर तुमचा जन्मही अशाच तारखांना झाला असेल, तर तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण लक्ष्मीमातेचा आशीर्वाद तुम्हाला सतत मिळत राहील. चला तर मग पाहूया, कोणत्या तारखांना जन्मलेल्या लोकांवर लक्ष्मीमाता आपली कृपा ठेवतात.
अंकज्योतिष शास्त्रानुसार, जन्मतारखेची संख्या एकत्र करून मूलांक काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीचा जन्म २४ तारखेला झाला असेल, तर त्याचा मूलांक ६ म्हणजेच (२+४) असेल.
६, १५, २४ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते देवी लक्ष्मीची कृपा (Mulank 6 Future)
अंकज्योतिष शास्त्रानुसार, मूलांक ६ हा देवी लक्ष्मीचा अंक मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीचा मूलांक ६ असेल, तर ती व्यक्ती खूप भाग्यवान ठरते, कारण अशा लोकांवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असते आणि हा अंक लक्ष्मीमातेला सर्वात प्रिय असतो.
अंक ६ चा संबंध सौंदर्य, प्रेम, ऐश्वर्य आणि भौतिक सुख-सुविधांशी असतो, ज्याचा अधिपती शुक्र ग्रह आहे. जर एखाद्याचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ६, १५ किंवा २४ तारखेला झाला असेल, तर त्याचा मूलांक ६ असतो. अशा लोकांवर धनाची देवी लक्ष्मीची खास कृपा राहते.