Numerology Predictions For Mulank 1 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. जन्मतारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल हेसुद्धा अगदी अचूक जाणून घेता येते. तुमच्या जन्मतारखेची गणना करून तुमचा मूलांक कोणता आहे हे तुम्हाला समजू शकते. मूलांक जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या जन्मतारखेची बेरीज करायची आहे. उदाहरणार्थ- जर तुमची जन्मतारीख १० असेल तर तुमचा मूलांक १+०=१ म्हणजे १ आहे.

अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आणि त्यांच्या कौटुंबिक नात्यांबद्दल जन्मतारखेवरून जाणून घेता येते. तर आज आपण अशा काही मूलांकांबद्दल जाणून घेणार आहोत; जे मूलांक असलेल्या महिलांना त्यांच्या जोडीदारांकडून पसंती मिळते; परंतु त्यांच्या सासू आणि वहिनींसोबतचे नाते अनेकदा आव्हानात्मक ठरते. तर कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ किंवा २८ तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक १ असतो. ही संख्या सूर्य देवाच्या प्रभावाखाली असते आणि त्यामुळे या मुलींमध्ये भरपूर आत्मविश्वास, नेतृत्व कौशल्य, आकर्षक व्यक्तिमत्त्व असते; त्या जिथे जातात, तिथे त्यांची उपस्थिती अनेकांचे लक्ष वेधून घेते.

थेट आणि स्पष्ट बोलतात (Mulank 1 Behaviour)

मूलांक १ असलेल्या व्यक्ती स्वतःच्या मतांवर ठाम असतात. त्या इतरांच्या दबावाखाली येऊन स्वतःचे निर्णय घेत नाहीत. त्यामुळे कधी कधी कुटुंबात मतभेद होऊ शकतात. अशा व्यक्ती स्वभाव, स्वतःच्या गोष्टी, निर्णय या बाबतीत ठाम असतात. त्यामुळे याउलट या मूलांकाच्या व्यक्तींच्या सासरची मंडळी सासू किंवा वहिनी पारंपरिक दृष्टिकोनाच्या असतील, तर त्यांच्यात मतभेद होणे स्वाभाविक आहे. अंकशास्त्रानुसार १ मूलांक असणाऱ्या मुली थेट आणि स्पष्ट बोलतात. त्यामुळे अनेकदा त्यांचे सासू आणि वहिनींशी भांडण होण्याची शक्यता जास्त असते. काही लोक त्यांच्या स्पष्टवक्तेपणाकडे अहंकार म्हणूनही पाहू शकतात.