Numerology: अंकशास्त्र १ ते ९ पर्यंत जन्म क्रमांक असलेल्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करते. जन्मतारखेचा वापर करून व्यक्तीचे व्यक्तिमत्व ठरवता येते. अंकशास्त्रानुसार मूलांकाच्या आधारे कोणत्याही व्यक्तीचा भूतकाळ, भविष्य आणि वर्तमान याबद्दल बरेच काही जाणून घेता येतं. मूलांक क्रमांक कोणत्याही महिन्यातील लोकांच्या जन्मतारखेच्या आधारे निर्धारित केला जातो. अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीचे भविष्य तसेच त्याचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव त्याच्या मुलांकावर काही प्रमाणात ओळखू शकतो. जन्म क्रमांक हा फक्त जन्मतारखेचा एकत्रित भाग आहे.अंकशास्त्रानुसार, या विशिष्ट मूलांकाच्या मुली उत्तम पत्नी आणि सुना बनतात. परिणामी, त्यांना त्यांच्या सासरच्या घरातील सर्वांकडून प्रेम आणि आदर मिळतो. त्याचप्रमाणे आज आपण अशाच एका मूलांकाबद्दल सांगत आहोत. जे मुलींसाठी खूप फायदेशीर असत. ही जन्मतारीख असलेल्या मुली सासरच्या घरी जाऊन नवऱ्याचं नशीब बदलत असतात.
अंकशास्त्रानुसार, ८ अंक असलेल्या मुली उत्तम सून होतात. त्यांना त्यांच्या सासरच्या घरात खूप प्रेम आणि आदर मिळतो. कोणत्याही महिन्याच्या ८, १७ किंवा २६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक ८ असतो. मुलांक ८ असलेल्या व्यक्तींमध्ये असे अनेक गुण असतात जे त्यांना आयुष्यात यशस्वी बनवतातच पण त्यांना आदर आणि सन्मान देखील देतात.
मुलांक अंक ८ आणि शनीचा प्रभाव
८ मुलांक अधिपती असलेल्या शनि ग्रहाचा या मुलांकानं जन्मलेल्यांवर विशेष प्रभाव असतो. शनीच्या प्रभावामुळे ८ मुलांक जन्मलेल्या मुली जबाबदार आणि समर्पित असतात. त्या त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण निष्ठेने पार पाडतात.या मुलींच्या भाग्याचे परिणाम लग्नानंतर त्यांच्या पतीच्या जीवनावरही पडतात. तीन मूलांक असलेल्या मुलींचं लग्न ज्यांच्याशी होतं, लग्नानंतर त्या मुलांचंही नशीब उजळतं. लग्नानंतर त्यांना जीवनात खूप यश मिळतं.
त्या सर्वांना आनंदी ठेवतात
मुलांक ८ असलेल्या मुली त्यांच्या कृती आणि वागण्याने सासरच्या सर्वांना आनंदी ठेवतात. त्या उत्कृष्ट पत्नी देखील ठरतात. त्या त्यांच्या पतींशी एकनिष्ठ असतात आणि काहीही झाले तरी त्यांना पाठिंबा देतात.त्या बदल्यात, तिला तिच्या पतीकडून प्रेम आणि आदर मिळतो. ती नेहमीच सत्याच्या बाजूने उभी राहते.